नागपूर : उपराजधानीतील गुन्हेगारी जगताचा डॉन मानला जाणारा शैलेंद्रसिंह लोहिया ऊर्फ लिटील सरदार (वय ४२) याच्यावर अनोळखी हल्लेखोरांनी रविवारी रात्री बेछूट गोळ्या चालविल्या. त्यातील एक गोळी कंबरेच्यावर (खांद्याजवळ) आणि दुसरी पायाला लागल्यामुळे लिटील सरदार गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे नागपुरातील गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली असून, पाचपावलीत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. लिटीलवर गोळ्या झाडणारे कोण, त्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. हत्या, हत्येचा प्रयत्न, गोळीबार यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शैलेंद्रसिंह लोहिया नागपुरातील गुन्हेगारांचा ‘बडा भाई‘ मानला जातो. तो लिटील सरदार म्हणून गुन्हेगारी जगतात परिचित आहे. दीड वर्षांपूर्वी जरीपटक्यात प्रतिस्पर्धी भुल्लर टोळीवर त्याने सिनेस्टाईल गोळीबार करून खळबळ उडवून दिली होती. पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर बरेच महिने तो कारागृहात होता. तिकडून आल्यानंतर त्याने गुन्हेगारीला अल्पविराम दिला असला तरी अनेक वादग्रस्त प्रकरणात दोन्ही गटांना समोरासमोर बसवून तो सेटलमेंट करून द्यायचा. लिटीलचे पाचपावलीतील अशोक चौकात मन्नत नावाचे शानदार कार्यालय असून रविवारी ते बंद असते. एक वादग्रस्त प्रकरण आल्यामुळे त्याने दोन्ही गटातील मंडळींना चर्चेसाठी रविवारी सायंकाळी कार्यालयात बोलविले होते. रात्री ७ पर्यंत या प्रकरणात चर्चा अन् निपटारा झाल्यानंतर लिटील तसेच त्याचे मित्र गोल्डी आणि अनुपसिंग कार्यालयाच्या बाहेर चर्चा करीत बसले होते. अचानक एका मोटरसायकलवर दोन हल्लेखोर आले आणि त्यातील एकाने खाली उतरून लिटीलवर पिस्तुलातून अंदाधुंद गोळ्या चालविल्या. त्यातील एक गोळी लिटीलच्या खांद्याजवळ आणि दुसरी पायाच्या घुटण्याजवळ लागली. मात्र, त्याही अवस्थेत लिटीलने बाजूचा दंडा उचलून हल्लेखोरांवर हल्ला चढवला. त्यामुळे घाबरलेले हल्लेखोर गोळ्या झाडत पळून गेले. हादरलेल्या गोल्डी आणि अनुपने लगेच आपल्या साथीदारांना गोळा करून लिटील सरदारला मदान हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. डॉक्टरांनी लगेच लिटीलवर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू केले. शस्त्रक्रिया करून पोलिसांनी दोन्ही गोळ्या काढल्याचे सांगण्यात येत
लिटील सरदारवर गोळीबार
By admin | Published: February 13, 2017 2:16 AM