शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
5
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
6
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
7
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
9
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

छोट्या मुलाला मोटरसायकलवर पाहिले

By admin | Published: January 13, 2015 1:02 AM

इटनगोटी तलावाच्या पंप हाऊसजवळ मी व माझ्या मैत्रिणीने आरोपींच्या मोटरसायकलवर मध्यभागी छोट्या मुलाला झोपलेल्या अवस्थेत पाहिले, अशी बेधडक साक्ष सावनेर तालुक्याच्या चांपा

न्यायालय : शाळकरी मुलीची बेधडक साक्षनागपूर : इटनगोटी तलावाच्या पंप हाऊसजवळ मी व माझ्या मैत्रिणीने आरोपींच्या मोटरसायकलवर मध्यभागी छोट्या मुलाला झोपलेल्या अवस्थेत पाहिले, अशी बेधडक साक्ष सावनेर तालुक्याच्या चांपा येथील एका शाळकरी मुलीने प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या बहुचर्चित युग चांडक अपहरण-खून खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिली. दिव्या दीपकसिंग चंदेल, असे या शाळकरी मुलीचे नाव आहे. ती पाटणसावंगी येथील आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आपल्या सरतपासणी साक्षीत या मुलीने सांगितले की, १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास मी आणि माझी वर्गमैत्रीण तनुश्री केचे शाळेतून आपापल्या सायकलने घराकडे परतत होतो. इटनगोटी तलावाच्या पंप हाऊसजवळून जात असताना आम्हाला एक मोटरसायकल उभी दिसली. मोटरसायकलवर तीन जण होते. आम्हाला पाहून चालकाने मोटरसायकल सुरू करून आमच्या दिशेने आणली. मोटरसायकल चालविणारा बदामी रंगाचा शर्ट घातलेला होता. मागे बसलेला लाल रंगाचा हाफ टी-शर्ट घातलेला होता. या दोघांच्या मध्ये एक मुलगा होता, तो झोपेलेल्या अवस्थेत होता. आम्ही त्यांना पांदण मार्गाने पाटणसावंगीकडे जाताना पाहिले. हे सर्व सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडले. गावात पोलीस एका मुलाचा फोटो घेऊन आले. फोटो पाहताच मला मी मोटर पंपजवळ पाहिलेला घटनाक्रम आठवला. तो मी पोलिसांना सांगितला. मोटरसायकल चालविणारे १८-२० वयोगटातील होते. या मुलीला न्यायालयात युगचा फोटो दाखविला असता तो तिने ओळखला. या मुलीने आपली साक्ष देताना पुढे सांगितले की, ओळख परेडसाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात हजर होण्याकरिता एका पोलीस कर्मचाऱ्याने पत्र आणून दिले होते. २५ सप्टेंबर रोजी कारागृहात गेली. तेथे दोन रांगांमध्ये लोकांना उभे करण्यात आले होते. आपणास आरोपींना ओळखण्यास सांगण्यात आले होते. आपण आरोपींना ओळखले. घटनेच्या दिवशी मोटरसायकलवर ते आरोपी होते. या मुलीने न्यायालयातही दोन्ही आरोपींना ओळखले. त्यांच्या अंगावरील आणि मोटरसायकलवर त्यांच्या मध्ये बसलेल्या मुलाचेही कपडे ओळखले. (प्रतिनिधी)तिने अंतराचे प्रात्यक्षिक करून दाखविलेउलटतपासणी साक्ष देताना ती म्हणाली, हे खरे आहे की आपण मोटरसायकलस्वारांना अंदाजे १५ फुटाच्या अंतरावरून पाहिले. तिने या अंतराबाबत न्यायालयात प्रात्यक्षिक करून दाखविले. ज्या ठिकाणी उभी राहून ती साक्ष देत होती, तेथून खिडकीपर्यंतचे अंतर असल्याचे तिने सांगितले. न्यायालयात तांदुळवाणी येथील श्रीराम खडतकर, बकऱ्या चारणारा नामदेव ढवळे, वर्धमाननगर येथील दीपक पुगलिया, शैलेश जोशी यांचीही साक्ष तपासण्यात आली. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी आणि सरकार पक्षाला सहाय्य म्हणून फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा तर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय आणि अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल हे तपास अधिकारी आहेत.