शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

लोकार्पण सोहळा ‘एलईडी’द्वारे ‘लाईव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 1:44 AM

रेशीमबाग मैदानात महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी ४.१५ वाजता या प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे.

ठळक मुद्देराष्ट्रपतींच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशीमबाग मैदानात महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी ४.१५ वाजता या प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे. हा सोहळा सर्वांना अनुभवता यावा, यासाठी रेशीमबाग मैदानावर एलईडीद्वारे थेट प्रक्षेपण होणार आहे. तसेच शहरातील चौकाचौकात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या व्हिडीओ स्क्रीनवर तसेच महापालिकेच्या फेसबुक पेजवरही थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे, अशी माहिती महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल विद्यासागर राव राहणार असून, मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित राहतील. लोकार्पण सोहळ्यानंतर सभागृहात गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी यांचा सुरेश भट यांच्या काव्य आणि गझलवर आधारित ‘केव्हा तरी पहाटे...’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, आयुक्त अश्विन मुदगल, माजी महापौर प्रवीण दटके, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, महापालिकेतील भाजपाच्या प्रतोद दिव्या धुरडे, प्रकल्पाचे वास्तुशास्त्रज्ञ अशोक मोखा यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुनासुरेश भट सभागृह हा वास्तुकलेचा उत्कृ ष्ट नमुना आहे. १९८८ प्रेक्षक क्षमता असलेले हे सभागृह महाराष्ट्रातील महापालिक ांच्या मालकीच्या सभागृहात सर्वाधिक क्षमतेचे सभागृह आहे. या प्रकल्पावर ७५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. सभागृहाच्या भूखंडाचे क्षेत्रफळ १२१२५.९५ चौ.मी. असून, सभागृहाचे बांधकाम ९७९४.०२ चौ.मी. क्षेत्रात करण्यात आले आहे. इमारतीची उंची ३० मीटर असून, तळघरात २०० कार, ६०० स्कूटर व ६०० सायकल पार्किंग, व्हीआयपी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु ही पुरेशी नाही. ४० टक्के जागा ही कार पार्किंगसाठी ठेवायला हवी. दिव्यांगांसाठी पहिल्या माळ्यावर व्यवस्था करण्यात आली आहे.क मी-अधिक आसन सुविधाकॉन्फरन्स रुम व एक्झिबिशन हॉल, भव्य प्रेक्षागृह, ध्वनिप्रक्षेपण यंत्रणा, दोन हजार क्षमतेचे भव्य प्रेक्षागृह असून तळमजल्यावर १४०० प्रेक्षक तर ६०० प्रेक्षक क्षमतेची बाल्कनी आहे. आयोजकाच्या क्षमतेनुसार १३००, १५७८ व १९८८ अशी आसन व्यवस्था ठेवण्याची सुविधा आहे. २५ मीटर रुंदीचा व ३०० चौ.मी.चा भव्य प्रेक्षागृह मंच आहे. १२ ग्रीन रुम व २ व्हीआयपी रुमची व्यवस्था आहे.सोलर ऊर्जेचा वापरसभागृहासाठी सोलर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. यासाठी सभागृहाच्या टेरेसवर ७७० सोलर पॅनल उभारण्यात आले आहेत. २०० केव्ही सौर ऊर्जानिर्मितीची व्यवस्था केली आहे. दर दिवशी ५० किलोवॅट ऊर्जा सोलर सिस्टीमद्वारे वापरून उर्वरित वीज वितरण कं पनीच्या ग्रीडमध्ये नेट मीटरद्वारे उपलब्ध होईल.कलावंतांना नवीन व्यासपीठपश्चिम नागपुरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे वसंतराव देशपांडे सभागृह आहे. परंतु आता सुरेश भट सभागृहामुळे मध्य, पूर्व व दक्षिण नागपुरातील लोकांची सुविधा होणार आहे. पश्चिम नागपूरप्रमाणे या भागातही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन शक्य होईल. या माध्यमातून कलावंतांना नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.फेसबुक लाईव्हमहापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवरही लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामुळे नागपूर शहरासह देशभरातील लोकांना हा सोहळा लाईव्ह अनुभवता येणार आहे. फेसबुक लॉग आॅन इन केल्यानंतर अ‍ॅट द रेट एमएमसीजीपी अथवा नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन या अधिकृत पेजवर हा सोहळा बघता येईल.सभागृहाची वैशिष्ट्येबांधकामाचा खर्च -७७.८५ कोटीभूखंडाचे क्षेत्रफळ - १५,७९६ चौ.मी.बांधकाम क्षेत्रफळ - ९,६८०इमारतीची उंची - २७ मीटरतळघरात दोन हजार वाहनांची पार्किंग व्यवस्थाभव्य प्रेक्षागृह क्षमता - २,०००तळमजला -१४००बाल्कनी - ६००भव्य पे्रक्षागृह मंच -रुंदी २५ मी., क्षेत्रफळ ३०० चौ.मी.कॉन्फरन्स रुम, एक्झिबिशन हॉल२० व्यक्ती क्षमतेच्या दोन लिफ्टवातानुकूलित सभागृहउच्च दर्जाची ध्वनिप्रक्षेपण व्यवस्थाआधुनिक विद्युत व्यवस्थाआक र्षक लॅन्ड स्के पिंग सौर ऊर्जानिर्मितीसाठी संयंत्र