शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

शेजारील राज्याच्या मेहरबानीमुळे नागपुरात प्लास्टिकचा सुळसुळाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2022 2:06 PM

नागपुरात प्रामुख्याने छत्तीसगढ येथील राजनांदगाव येथून प्लास्टिकच्या पिशव्या येत आहेत.

ठळक मुद्देट्रकने नागपूरच्या गोदामात पोहोचतो मालदुचाकींनी केले जाते वितरण

राजीव सिंह 

नागपूर : प्रतिबंध असतानाही चार वर्षांपासून बाजारात ठेले, दुकाने आणि प्रतिष्ठानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा उपयोग बिनधास्त होत आहे. महाराष्ट्रात जून २०१८ मध्ये प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या साहित्यांचे उत्पादन, संग्रहण, उपयोग आणि आयातीवर निर्बंध आणण्यात आले होते. असे असतानाही नागपुरात प्रतिबंधित प्लास्टिक येतं कुठून, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर सांगायचे झाल्यास हा सगळा माल शेजारचे राज्य छत्तीसगढ येथून येतो. नागपुरात प्रामुख्याने छत्तीसगढ येथील राजनांदगाव येथून प्लास्टिकच्या पिशव्या येत आहेत.

ट्रक, मेटॅडोर, लहान वाहनांच्या माध्यमातून प्लास्टिकच्या पिशव्या नागपुरात चोरट्या मार्गाने लपून-छपून गोदामात ठेवल्या जात आहेत. गोदामांतून दुचाकीच्या साहाय्याने दुकानांमध्ये स:शुल्क पुरवठा केला जाता आहे. त्यासाठी रोजंदारीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचे मुख्य केंद्र गांधीबाग व लकडगंज झोन आहे. कारवाईसाठी मनपाच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॅडची (एनडीएस पथक) नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून २३ जून २०१८ पासून ते २८ मार्च २०२२ पर्यंत एकूण २९८८ प्रकरणे उघडकीस आली असून, त्यांच्याकडून १ कोटी ५५ लाख ६५ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सोबतच ४४,९९६.३५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

एनडीएस पथक प्रमुख विरसेन तांबे यांनी सांगितल्यानुसार, या कारवाईतून राजनांदगाव येथून प्लास्टिक पिशव्या येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा माल अतिशय गुप्ततेने नागपुरात आणला जातो आणि डेपोमध्ये संग्रहित केला जातो. यावर पथकाची करडी नजर असून, कारवाईची प्रक्रिया निरंतर सुरू असल्याचे तांबे यांनी सांगितले.

जप्तीच्या तुलनेत दंड कमी

गांधीबाग झोनमध्ये तीन वर्षांपूर्वी जवळपास १६ टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. ही कारवाई दोन दिवस सुरू होती. मात्र, कारवाईच्या नावावर केवळ पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता. जानेवारीमध्ये १७० किलो प्लास्टिक पकडण्यात आले होते. तेव्हाही एवढाच दंड ठोठावण्यात आला होता. प्रतिबंधित माल किलोमध्ये जप्त करा किंवा टन मध्ये, दंडाचे शुल्क निर्धारित असल्याने प्लास्टिक पिशव्यांच्या तस्करांमध्ये भय नसल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पहिल्या वेळेच पाच हजार आणि दुसऱ्या वेळेच १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येतो. तिसऱ्या वेळेस उल्लंघन केल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांचा तुरुंगवास, अशा शिक्षेची तरतूद आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPlastic banप्लॅस्टिक बंदीpollutionप्रदूषणnagpurनागपूर