लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सर्व भागाला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जेएनएनयूआरएम व अमृत योजनेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात जलवाहिन्या टाकणे, जलकुंभांची कामे हाती घेण्यात आली. नासुप्रच्या माध्यमातून वांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभांचे बांधकाम करण्यात आले. परंतु यात तांत्रिक त्रुटी असल्याने जलकुंभांचे हस्तांतरण रखल्याने महापालिकेला ६० ते ७० टँरवर खर्च करावा लागत आहे.शहराला पाणीपुरठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात पुरेसा जलसाठा असला तरी शहराच्या सर्व भागात नळाचे नेटवर्क नसल्याने मोठ्या प्रमाणात टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागतो. यात वाठोडा, दाभा, भरतवाडा, हुडकेश्वर नरसाळा, टेका नाका, इंदोरा, पारडी, दिघोरी, पिपळा, पारडी आदी वस्त्यांचा समावेश आहे.महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना जलकुंभाचे हस्तांतरण रखडल्याने महापालिकेला हकनाक ६० ते ७० टँकरवर खर्च करावा लागत आहे.१५ ऑगस्टपर्यंत जलकुंभांचे हस्तांतरणवांजरा, कळमना, नारा व चिंचभवन आदी भागातील पाणीटंचाई विचारात घेता या चार जलकुंभांचे शिल्लक असलेले बांधकाम पूर्ण करून १५ ऑगस्टपर्यंत जलकुंभ मनपाला हस्तांतरित करण्याचे निर्देश नासुप्रला दिले आहेत. या संदर्भात शुक्रवारी नासुप्र व मनपाच्या जलप्रदाय विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जलकुंभावरून पाणीपुरवठा सुरू झाला तर ६० ते ७०टँकर कमी होतील. यामुळे मनपाची आर्थिक बचत होइल.पिंटू झलके, अध्यक्ष स्थायी समिती ,मनपाअमृत योजनेतून ४५ जलकुंभांचे कामशहरालगतच्या पाणीपुरवठा होत नसलेल्या भागासाठी केंद्र सरकार पुरस्कृत २७३ कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेची २०१६ मध्ये घोषणा झाली. २७३.७८ कोटी कोटींच्या या योजनेतून शहराच्या विविध भागात जलवाहिन्यांटचे जाळे निर्माण करणे व जलकुंभ निर्माण आदी कामांचा समावेश होता. यातील ४५ जलकुंभांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
नागपुरात चार जलकुंभाचे हस्तांतरण रखडल्याने ७० टँकरचा बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 8:03 PM
नासुप्रच्या माध्यमातून वांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभांचे बांधकाम करण्यात आले. परंतु यात तांत्रिक त्रुटी असल्याने जलकुंभांचे हस्तांतरण रखल्याने महापालिकेला ६० ते ७० टँरवर खर्च करावा लागत आहे.
ठळक मुद्देवांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभाची किरकोळ कामे शिल्लक