निर्बंध असताना सर्रास विक्री : सीए रोड, गांधीबाग, इतवारीतील लालइमली, जरीपटका वसाहती धोक्यातनागपूर : चिनी फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध लावण्यात आले असताना या फटाक्यांची मोठ्या प्रमाणात चोरून विक्री होत आहे. हे फटाके विक्रीस सुलभ व्हावे म्हणून त्याच्या सारखे दिसणारे बनावट फटाके बाजारात आले आहेत. यावर ‘मेड इन मुजफ्फरनगर’ लिहीले आहे. विशेषत: पटक बॉम्ब (पॉपपॉप) हा फटाका नागपुरात तयार झाला असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. ठोक विक्रेत्यांकडे तो आठ ते दहा रुपये किमतीला उपलब्ध आहे. परंतु तो फुटतच नसल्याच्या अनेक चिल्लर विक्रेत्यांच्या तक्रारी आहेत. या सारखे अनेक चिनी बनावट फटाके बाजारात आले असून काही फटाके धोकादायक असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दिवाळी हा जल्लोष, उत्साहाचा सण. परंतु या पावित्र्याला चिनी फटाक्यांचे गालबोट लागले आहे. या फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. यामुळेच चिनी फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध असताना उपराजधानीतील गांधीबाग, इतवारीतील लालइमली, जरीपटका व आता सीए रोडवरही या सारख्या अतिगर्दीच्या ठिकाणी हे फटाके सर्रास विकले जात आहे.‘लोकमत’ चमूने रविवारी या फटाक्यांचा बाजार असलेल्या गांधीबागपासून ते इतवारी, सीए रोड आणि जरीपटका बाजारात याचा फेरफटका मारला असता जिथे दुचाकीही जाऊ शकत नाही, अशा गर्दीच्या ठिकाणी चिनी फटाके सर्रास विकले जात असल्याचे दिसून आले. यामुळे एखादी अघटित घटना घडल्यास मोठी जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे.
लोकल फटाक्यांना चिनी ‘बार’!
By admin | Published: October 24, 2016 2:39 AM