लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. या कठीण परिस्थितीतही कोळसा उत्पादन सुरू आहे. नागरिकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी वीज केंद्रांना कोळशाची कमतरता भासू नये म्हणून सातत्याने कोळसा पुरवठा सुरू आहे. याअंतर्गत वेकोलिने २०१९-२० या वर्षातील उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण केले असून ३१ मार्च रोजी आतापर्यंतच्या सर्वाधिक कोळशाचे उत्खननही केले आहे.कंपनीने लॉकडाऊनच्याच काळात २७ मार्च रोजी वेकोलिच्या ४२,००० कर्मचाऱ्यांनी एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक ४.०२ लाख टन कोळशाचे उत्पादन केले होते. हे रेकॉर्डसुद्धा ३१ मार्च रोजी तुटले. या दिवशी ५.०२ लाख टन कोळशाचे उत्पादन करण्यात आले. यापूर्वी २७ मार्च रोजी वेकोलिने एका दिवशी सर्वाधिक ४.०२ लाख टन कोळशाचे उत्पादन केले होते. सोबतच वेकोलिने वर्ष २०१९-२० साठी ठरवलेले लक्ष्य ५६ मिलियन टनाऐवजी ५७.६४ मिलियन टन उत्पादन केले होते. लॉकडाऊन असूनही वेकोलिने ८.४ टक्के वाढ नोंदवली आहे. आता कंपनीने वर्ष २०२०-२१ साठी वेकोलिला ६२ मिलियन टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. व्यावसायिकदृष्ट्या वाळू उत्खननाची परवानगी मिळाल्यानंतर वेकोलि सरकारी संस्थांना स्वस्त दरावर वाळूसुद्धा देत आहे.मास्क वाटले, रुग्णालयात विशेष खाटावेकोलि व्यवस्थापनातर्फे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. कर्मचाऱ्यांना २५,००० मास्क वाटण्यात आले आहेत. १० हजार आणखी उपलब्ध केले जाणार आहेत. १० हजार रुमाल किंवा स्कार्फसुद्धा देण्यात आले आहेत. प्रत्येक खदानीमध्ये हँडवॉश उपलब्ध करून देण्यात आले आहे. दोन कर्मचाऱ्यांमध्ये अंतर ठेवले जात आहे. प्रत्येक मशीन, उपकरणांना सॅनिटाईझ केले जात आहे. दुसरीकडे कंपनीच्या दहा रुग्णालयांमध्ये कोरोना संशयित रुग्णांसाठी विशेष बेड तयार करण्यात आलेले आहेत. डॉक्टर्स, नर्स आणि मेडिकल स्टाफला अलर्ट ठेवण्यात आले आहे.मुख्यालयातील गर्दी कमी, टास्क फोर्स गठितखदानींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कायम आहे. परंतु मुख्यालय व इतर प्रशासकीय कार्यालयांमध्ये दहा टक्के कर्मचाऱ्यांवर काम चालवले जात आहे. यासोबतच कोरोनासंदर्भात टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे.
लॉकडाऊनमध्येही कोळशाचे रेकॉर्ड उत्पादन : वीज केंद्रांना पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:09 PM
नागरिकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी वीज केंद्रांना कोळशाची कमतरता भासू नये म्हणून सातत्याने कोळसा पुरवठा सुरू आहे. याअंतर्गत वेकोलिने २०१९-२० या वर्षातील उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण केले असून ३१ मार्च रोजी आतापर्यंतच्या सर्वाधिक कोळशाचे उत्खननही केले आहे.
ठळक मुद्दे३१ मार्च रोजी सर्वाधिक उत्खनन