शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

नागपुरात लॉकडाऊन लावायचे की नाही? वडेट्टीवार-राऊत आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 9:49 PM

Nagpur News नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात निर्बंध लावण्याचे संकेत देऊन २४ तासदेखील उलटले नसताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेमकी विरुद्ध भूमिका मांडली आहे.

ठळक मुद्देराऊतांच्या भूमिकेशी वडेट्टीवार सहमत नाहीत निर्बंध लावण्याचा निर्णय कॅबिनेटच्या अखत्यारित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात निर्बंध लावण्याचे संकेत देऊन २४ तासदेखील उलटले नसताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेमकी विरुद्ध भूमिका मांडली आहे. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दोन दिवसात वाढली असली तरी सध्याच लॉकडाऊन लावण्याचे नियोजन नाही. निर्बंध लावणे अथवा वाढविणे ही जबाबदारी कॅबिनेटची असते. अद्याप तशी भूमिका राज्यात कुठेही घेतलेली नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. राज्यातील दोन मंत्र्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे निबंर्धांबाबतचा संभ्रम आणखी वाढीस लागला आहे. (Lockdown in Nagpur yes or not? Vadettiwar-Raut face to face)मंगळवारी नागपूर प्रेस क्लबच्यावतीने आयोजित मीट द प्रेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, हे खरे असले तरी रुग्णसंख्येवर पुढील निर्णयाची परिस्थिती अवलंबून असेल. नागपूर संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली अथवा नाही, हे आपणास माहीत नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने पूर्वतयारी केली आहे. रुग्णालय आणि ऑक्सिजनचेही नियोजन केले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक निर्बंध करण्याचा विषय सध्या कॅबिनेट समोर नाही. मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट यावर लक्ष ठेवून आहे. मुंबईत थोडी वाढ आहे, नागपुरात वाढीला सुरुवात झाली आहे. टास्क फोर्स आणि तज्ज्ञांसोबत चर्चा करूनच पुढील निर्णय ठरवला जाईल. तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. कधीही प्रवेश करू शकते, ती रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.महाज्योतीला बदनाम करू नकामहाज्योतीवरून होत असलेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, महाज्योतीला कुणीही बदनाम करू नये. महाज्योती स्थापन होऊन जेमतेम दोनच वर्षे झाली, वर्षभर कोरोनामुळे काम करता आले नाही. हे समजून घ्यावे. महाज्योतीसाठी मार्च-२०२१ पर्यंत ३५ कोटी आणि सप्टेबर-२०२१ पर्यंत ४.५० कोटी असा ४९.५० कोटी रुपयांचा निधी आला. असे असताना १२५ कोटी निधी परत कुठून जाणार, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNitin Rautनितीन राऊत