लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ लॉकडाऊनमुळे शाळांचे वर्ग सध्याऑनलाईन सुरू असून त्याकरिता लॅपटॉप आणि मोबाईलचा उपयोग करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोटबुक आणि रजिस्टरचा विसर पडला आहे. याशिवाय शाळा आणि कॉलेज केव्हा सुरू होणार, यावर अनिश्चितता आहे. त्यातच पालकांनाही शालेय वस्तूंच्या खरेदीकडे पाठ फिरविल्याने विक्री थांबली आहे. त्यामुळे नागपुरात शालेय साहित्यांची जवळपास ६० कोटींची उलाढाल मंदावली आहे.दरवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात स्टेट आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू होतात. त्यापूर्वी शाळेय साहित्य खरेदीला सुरुवात होते. यामध्ये बॅग, वह्या, पुस्तके, रजिस्टर, नवीन गणवेष, शूज, रेनकोट, छत्री आदी वस्तू खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी उसळते. तत्पूर्वी व्यापारी या साहित्यांचा मोठ्या प्रमाणात साठा करतात. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीनुसार व्यापारी विविध कंपन्यांचे काम्पॉस, बॅग या सारख्या वस्तूंच्या साठ्यासाठी जास्त गुंतवणूक करतात. मात्र यंदा पालकांचा खरेदीकडे कल नसल्याने विक्रेते चिंतेत आहेत.या साहित्यांचे उत्पादन जानेवारीपासूनच सुरू होते. सिझनमध्ये कमतरता जाणवू नये म्हणून यावर्षीही व्यापाऱ्यांनी पुढील शैक्षणिक सत्रासाठी साहित्यांचा साठा सुरू केला. याशिवाय नोटबुक आणि रजिस्टरची निर्मिती वेगात सुरू झाली आणि बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले. पण राज्यात १९ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्वच बाजारपेठा बंद झाल्या आणि व्यवहार थांबले. लॉकडाऊन महिना वा दोन महिने राहिल असा कयास बांधला जात होता. पण लॉकडाऊन वाढल्याने सर्वच व्यवहारावर प्रतिबंध आले. अनलॉक-१ मध्ये १ जूनपासून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. पण शाळा केव्हा सुरू होणार याबाबत राज्य शासनाचा निर्णय झालेला नाही.नोटबुक व रजिस्टर उत्पादक कामगारांवर संकटशैक्षणिक सत्राच्या दोन महिन्यांपूर्वी खासगी शाळा व्यापाऱ्यांना नोटबुक, रजिस्टर आणि गणवेष निर्मितीचे आॅर्डर देतात. असे आॅर्डर घेणारे नागपुरात मोठे १५ ते २० व्यापारी आहेत. हे व्यापारी घरगुती निर्मिती करणाºयांना कंत्राट देतात. गांजाखेत, टिमकी, लालगंज, शांतीनगर या भागात ३०० पेक्षा जास्त कुटुंबीय या कामात गुंतले आहेत. पण यावर्षी कंत्राट न मिळाल्याने सर्वांवर संकट आले आहे. कच्च्या मालापासून फिनिश मालाच्या निर्मितीची साखळीच थांबली आहे. यामुळे कोट्यवधींची निर्मिती थांबली आहे.यावर्षी ६० ते ७० कोटींच्या उलाढाल थांबलीनोटबुक, रजिस्टर, शालेय गणवेष, पेन निर्मितीसाठी नागपूर विदर्भाची मोठी बाजारपेठ आहे. या क्षेत्रात दरवर्षी ६० ते ७० कोटींची उलाढाल होते. सर्वच व्यापाºयांनी शालेय साहित्यांची निर्मिती केली आहे. सर्वच माल दुकानांमध्ये आणि विदर्भातील व्यापाºयांकडे वितरित केला आहे. पण लॉकडाऊनमुळे सर्व माल विक्रीविना पडून आहे. विद्यार्थी आवश्यक तेवढीच खरेदी करीत आहेत. त्यामुळे उलाढाल मंदावली असून किरकोळ व्यापाऱ्यांकडून मालाला मागणीच नाही. असे संकट पहिल्यांदाच पाहत आहे. कोरोना दूर होऊन सर्व संकटे दूर व्हावीत आणि व्यवसाय पूर्ववत व्हावा.अर्जुनदास आहुजा, अध्यक्ष, विदर्भ पेन व स्टेशनर्स असोसिएशन.
लॉकडाऊनमुळे नागपुरात शालेय साहित्याची विक्री मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 8:43 PM
कोविड-१९ लॉकडाऊनमुळे शाळांचे वर्ग सध्याऑनलाईन सुरू असून त्याकरिता लॅपटॉप आणि मोबाईलचा उपयोग करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोटबुक आणि रजिस्टरचा विसर पडला आहे. याशिवाय शाळा आणि कॉलेज केव्हा सुरू होणार, यावर अनिश्चितता आहे. त्यातच पालकांनाही शालेय वस्तूंच्या खरेदीकडे पाठ फिरविल्याने विक्री थांबली आहे. त्यामुळे नागपुरात शालेय साहित्यांची जवळपास ६० कोटींची उलाढाल मंदावली आहे.
ठळक मुद्देशाळा व कॉलेज सुरू होण्यावर अनिश्चितता : ६० कोटींची उलाढाल मंदावली