शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांनी जोपासला पक्षिनिरीक्षणाचा छंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 12:19 AM

लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालये आणि शाळा बंद पडल्या असल्या तरी ज्यांनी अंगी छंद लावून घेतला, अशांसाठी मात्र ही पर्वणी ठरली आहे. या लॉकडाऊनमधील सुटीचा सदुपयोग येथील दोन विद्यार्थ्यांनी केला. यातून त्यांनी चिंचवन नाल्याच्या परिसरात ४२ पक्ष्यांची नोंद घेतली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे पक्षी गावात : चिंचभवन नाला परिसरात ४२ पक्ष्यांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालये आणि शाळा बंद पडल्या असल्या तरी ज्यांनी अंगी छंद लावून घेतला, अशांसाठी मात्र ही पर्वणी ठरली आहे. या लॉकडाऊनमधील सुटीचा सदुपयोग येथील दोन विद्यार्थ्यांनी केला. यातून त्यांनी चिंचवन नाल्याच्या परिसरात ४२ पक्ष्यांची नोंद घेतली.

ओजस आनंद हरकरे आणि त्याचा भाऊ आर्यन अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. येथील चिंचभवन परिसरातील राधाकृष्ण मंदिराजवळील मेहरबाबा कॉलनीत ते राहतात. ओजस दहावीत असून आर्यन पाचव्या इयत्तेत आहे. घरात बसून कंटाळा आल्याने या दोघा भावंडांनी पक्षिनिरीक्षणाचा छंद जडवला. चिचभवन परिसरातील मार्ग तसा वर्दळीचा आहे. येथील नाल्यावर सध्या खोदकाम सुरू आहे. मात्र लॉकडाऊनमुळे हे काम बंद असल्याने हा परिसरात आता शांत असतो. या शांततेच्या वातावरणात सध्या या परिसरात अनेक प्रकारच्या पक्ष्यांची वर्दळ वाढली आहे नवनवीन पक्षी या परिसरात बघावयास मिळत आहेत. त्यामुळे या दोन्ही भावंडांचे कुतूहल जागृत झाले. त्यातून त्यांनी घराच्या खिडकीशी आलेल्या एका पिवळ्या पक्षाचा मोबाईलने फोटो घेतला व कुतूहलापोटी गुगलवर माहिती शोधली असता तो पक्षी महाराष्ट्राचा राजपक्षी हॅलो फुटेड ग्रीन पिजन असल्याचे लक्षात आले. या दोघांचे कुतूहल जागृत झाले. त्यामुळे त्यांनी नाल्याच्या काठावर जाऊन नवीन पक्षी शोधण्याचे काम सुरू केले. घरी असलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोटोग्राफी केली. वाईल्ड फोटोग्राफी कशी करावी याचे प्रशिक्षण त्यांनी यूट्यूबवरून घेतले व त्या पक्षांचे सुंदर छायाचित्रे काढली.मागील पावणेदोन महिन्यात या भावंडांनी या नाला परिसरात येणाºया ४२ पक्ष्यांची नोंद घेतली आहे. यातील अनेक पाहुणे पक्षीदेखील आहेत. लॉकडाऊनमुळे पशुपक्षी निर्भयपणे फिरायला लागले आहेत. यानिमित्ताने ही पक्षी अभ्यासकांसाठी योग्य संधी असल्याचे या घटनेवरून लक्षात येत आहे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यStudentविद्यार्थी