शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
3
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
4
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
5
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
7
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
8
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
9
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
11
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
12
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
13
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
14
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
15
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
16
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
17
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
18
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
19
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
20
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

Lok Sabha Election 2019; नागपुरात बॅनर, फ्लेक्सच्या २६ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:00 AM

निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’च्या माध्यमातून प्रथमच सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देसी-व्हिजिल अ‍ॅप’ नागरिकांसाठी ठरतेय प्रभावी अस्त्रअर्ध्या तासात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’च्या माध्यमातून प्रथमच सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून नागरिकही स्वतंत्र व नि:पक्षपाती निवडणुकांच्या संचलनासाठी सक्रियपणे जबाबदार भूमिका बजावू शकतात. नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील २६ नागरिकांना ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’चा वापर करून आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबतच्या तक्रारी प्रथमच दाखल केल्या आहेत.भारत निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’ जनतेसाठी उपलब्ध करून दिले असून, नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेले बॅनर व फ्लेक्स असल्याबाबत सी-व्हिजिल अ‍ॅपवरून तक्रारी केल्या आहेत. यापैकी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सादर झालेल्या सर्व तक्रारींची तात्काळ दखल घेतली. यापैकी १३ ठिकाणी असलेले बॅनर तात्काळ हटविले आहे. तसेच १० तक्रारींची प्रत्यक्ष पडताळणी केली असता त्या जागेवर आचारसंहितेचा भंग होत नसल्याचे आढळून आले. दोन तक्रारी चौकशीस्तरावर आहेत. तर एक तक्रार निर्णय प्रक्रियेत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.रामटेक लोकसभा मतदार संघात सी-व्हिजिल अ‍ॅप या मोबाईलच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून कामठी व रामटेक येथील पाच तक्रारींचा समावेश आहे. नागपूर मतदार संघातील नागपूर-दक्षिणमध्ये दोन, नागपूर दक्षिण-पश्चिममधील ११, नागपूर-पूर्वमधील तीन तर नागपूर उत्तरमधील एका तक्रारीचा समावेश आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर या तक्रारीसंदर्भात सरासरी २ ते २९ मिनिटांच्या आत दखल घेऊन कारवाई करण्यात आली आहे.‘सी-व्हिजिल या अ‍ॅप’मार्फत नागरिकांना आदर्श आचारसंहिता भंग होत आहे असे वाटत असल्यास नागरिकांनी त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा आणि भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह अ‍ॅपवर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. त्यानंतर तक्रार करणाऱ्या नागरिकांच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशाप्रकारे आचारसंहितेसंदर्भातील घटना नोंदवू शकतात.नागरिकांनी तक्रार नोंदविल्यानंतर ती अवघ्या पाच मिनिटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त होते. त्या माहितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ही तक्रार पाठविण्यात येते. त्यानंतर जीव्हीआयजी, आयएल अन्वेषक या जीआयएसआधारित मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या सहाय्याने संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या १५ मिनिटांच्याआत पोहचणे अपेक्षित आहे.संबंधित तक्रारीबाबत प्राथमिक तपास व तक्रारींच्या तथ्यांची तपासणी करून यासंबंधीचा अहवाल या अ‍ॅपद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठविल्या जातो. हा अहवाल ३० मिनिटांपेक्षा कमी कालावधीत पोहचणे आवश्यक आहे. या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येते आणि तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या १०० मिनिटांच्या आत तक्रारींची स्थिती तक्रारदार नागरिकांना पाठविण्यात येईल. तक्रार करणाऱ्या नागरिकांना मोबाईलवरसुद्धा संदेशाद्वारे कळविण्यात येईल.

कुणी आमिष दाखवत असेल तरी तक्रार करानागरिकांनी आचारसंहिता भंग होत असलेल्या तक्रारीसंदर्भात ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’चा वापर करावा तसेच तक्रार नोंदवायची असल्यास राज्य संपर्क क्रमांक १९५० यावरसुद्धा कॉल करता येईल. ‘सी-व्हिजिल मार्फत मतदारांना पैसा, मद्य आणि अमली पदार्थांचे वाटप मतदारांना मारहाण अथवा दमबाजीचा प्रकार, जमावाला चिथावणीखोर भाषण तसेच मतदारांना आमिष आदीबाबत तक्रार करता येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी आवाहन केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक