ठळक मुद्देकुठे स्टीकर तर कुठे कटआऊट
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पूर्णत: सुरू झाली नसली तरी बाजारपेठांमधून त्याची चुणूक पहावयास मिळू लागली आहे. लोकसभा निवडणुकीचा खरा माहोल सोमवारपासून दिसणार आहे. निवडणूक प्रचार साहित्याची मागणीही वाढणार आहे. प्रमुख पक्षांच्या विविध नेत्यांचे मुखवटे निवडणूक प्रचारात वापरण्यात येणार आहेत. स्टीकर स्वरुपातील व कटआऊट असलेले मुखवटे विक्रीसाठी आले आहेत. हे मुखवटे जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष तर वेधून घेत आहेतच पण ते घालून मिरवायलाही कार्यकर्ते उत्सुक झाले आहेत.