लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केलेल्या शंकेनंतर प्रशासनाने जाहीर खुलासा करीत सुरक्षेबाबत आश्वस्त केले आहे. परंतु प्रशासनाच्या खुलाशाने राजकीय पक्षांचे काही समाधान झाल्याचे दिसत नाही. म्हणूनच काँग्रेसनंतर आता बसपाने सुद्धा ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत केंद्रीय निवडणूक निरीक्षक सारदा देवी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून सर्वच व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा केली आहे. बसपातर्फे प्रदेश सचिव व मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी ही तक्रार केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, काँग्रेसचे उमेदवार पटोले यांनी पत्रपरिषद घेऊन ईव्हीएमच्या सुरक्षेवर शंका व्यक्त केली आहे. स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही बंद असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅटमधील जमा झालेल्या मतदान चिठ्ठ्यांचीही मोजणी करावीे, असे बसपाने म्हटलेय.
Lok Sabha Election 2019; व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची व्हावी मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:32 AM
काँग्रेसनंतर आता बसपाने सुद्धा ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत केंद्रीय निवडणूक निरीक्षक सारदा देवी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून सर्वच व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा केली आहे.
ठळक मुद्देबसपाची मागणीनिवडणूक निरीक्षकांकडे तक्रार