लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक व नागपूर निर्वाचन क्षेत्रामध्ये ११ एप्रिल २०१९ रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तर २३ मे २०१९ रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात निवडणुकीच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी दारुबंदी म्हणजे कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे. आदेशाचा भंग करणाऱ्या संबंधित मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकाविरूद्ध कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुदगल यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Lok Sabha Election 2019; मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ‘ड्राय डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 10:50 AM