जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत १४ महिला उमेदवारांनी नशीब आजमावले. पण रामटेकचा गड सर करण्यात यश आले ते राणी चित्रलेखा भोसले यांना. १९९८ च्या निवडणुकीत ३ लाख २५ हजार ८८५ मते मिळवित चित्रलेखा भोसले रामटेकच्या पहिल्या महिल्या खासदार झाल्या.रामटेक लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर या मतदारसंघात आतापर्यंत १४ सार्वत्रिक आणि दोन पोटनिवडणुका झाल्या आहेत. १९५७ मध्ये या मतदारसंघात काँग्रेसचे कृष्णराव देशमुख हे विजयी झाले. देशमुख यांना १ लाख ६६ हजार १२३ मते मिळाली. त्यांच्याविरोधातील अपक्ष उमेदवार कृष्णराव यावलकर यांनी १ लाख २ हजार ४५० मते घेतली. यानंतर १९६२, १९६७, १९७१ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली.पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तब्बल २० वर्षांनी १९७७ मध्ये या मतदारसंघातून अलका पांडे या अपक्ष उमदेवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या. त्यांनी १८६४ मते घेतली. त्यावेळी काँग्रेसचे जतिराम बर्वे (१,९६,९७७ मते)े विजयी झाले होते.१९८९ मध्ये लोकदलतर्फे लताबाई क्षत्रीय यांनी निवडणूक लढविली. मात्र काँग्रसेचे पी. व्ही. नरसिंहराव (२,५७,८०० मते) यांच्यासारखा दिग्गज समोर असल्याने त्यांना ६७७ मतांवरच समाधान मानावे लागले. १९९१ मध्ये काँग्रेसच्या तेजसिंगराव भोसले यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱ्या देवकीबाई नगरकर यांना १,६१४ मते प्राप्त झाली. १९९६ मध्ये पहिल्यांदा दोन महिला उमेदवार राटमेटकचा गड सर करण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या. या निवडणुकीत कमलबाई घटे यांनी ९८९ तर लता फुलझेले यांनी ९६४ मते मिळविली. काँग्रेसचे दत्ता मेघे यांनी २ लाख ०७ हजार १८८ मते मिळवित विजय मिळविला होता.१९९८ मध्ये भोसल्यांचा राजकीय वारसा असलेल्या चित्रलेखा भोसले यांना काँग्रेसने रामटेकमध्ये संधी दिली. त्यावेळी शिवसेनेकडून अशोक गुजर तर बहुजन समाज पक्षाकडून राम हेडाऊ मैदानात होते. चित्रलेखा भोसले यांनी ३ लाख २५ हजार ८८५ मते घेत गुजर यांचा ६७,०३८ मतांनी पराभव केला. सेनेचे गुजर यांना २ लाख ५८ हजार ८७४ मते मिळाली.१९९९ मध्ये राजश्री देवी यांनी गोंडवाना गणतंत्र पक्षाकडून तर २००४ मध्ये नयना धवड यांनी नशीब आजमावले. या दोन्ही निवडणुकीत सेनेचे सुबोध मोहिते यांनी गड सर केला. २००९ मध्ये मतदारसंघाच्या फेररचनेनंतर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तेव्हा महिला उमेदवारांची या मतदारसंघातील संख्याही वाढली. २००९ मध्ये बहुजन रिपब्लिकन एकता मंचकडून सुलेखा कुंभारे, समाजवादी पार्टीतर्फे माया चवरे तर डेमोक्रॅटिक सेक्युलर पार्टीतर्फे सीमा रामटेके यांनी निवडणूक लढविली. मात्र या तिघींनाही पराभवाचा सामना करावा लागले. कॉँग्रेसचे मुकुल वासविक यांनी येथे बाजी मारली. २०१४ च्या निवडणुकीत येथे तीन महिलांनी नशीब अजमाविले. बसपातर्फे किरण पाटणकर, समाजवादी पार्टीतर्फे माया चवरे तर आंबेडकर पार्टी आॅफ इंडियातर्फे धिमती विद्या किशोर भिमटे मैदानात होत्या. बसपाच्या किरण पाटणकर यांना ९५ हजार ०५१ मतांवर समाधान मानावे लागले.
आठ निवडणुकीत महिला उमेदवार नाहीरामटेक लोकसभा मतदारसंघात आजवर १५ सार्वत्रिक व २ पोटनिवडणुका झाल्या आहेत. मात्र या मतदारसंघात १९५७, १९६२, १९६७, १९७१, १९८०, १९८४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकाही महिला उमेदवाराला निवडणूक लढण्याची संधी मिळाली नाही. यासोबतच १९७४ आणि २००७ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही एकाही महिलेने अर्ज भरला नाही, हे विशेष.
भोसल्यांचा वारसा१९९८ मध्ये रामटेकचे मैदान मारणाऱ्या चित्रलेखा भोसले यांना राजकीय वारसा होता. त्यांचे पती तेजसिंगराव भोसले या मतदारसंघात काँग्रेसकडून विजयी झाले होेते.