शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

Lok Sabha Election 2019 : आंतरराज्य सीमेवर राहणार वॉच : तपासणी पथके तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 8:26 PM

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर संयुक्त तपासणी पथके सज्ज करण्यात आली असून अवैधपणे वाहतूक, दारू तसेच तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही राज्याच्या सीमा सील करण्यात येतील. प्रत्येक वाहनांची कडक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली समन्वय बैठक : गुन्हेगारांविरुद्ध दोन्ही राज्ये वॉरंट काढणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर संयुक्त तपासणी पथके सज्ज करण्यात आली असून अवैधपणे वाहतूक, दारू तसेच तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही राज्याच्या सीमा सील करण्यात येतील. प्रत्येक वाहनांची कडक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बुधवारी दिली.महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर तपासणी नाके सुरू करण्यासंदर्भात छिंदवाडा येथील जिल्हाधिकारी श्रीनिवास शर्मा, मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक जी.के. पाठक तसेच अमरावती विभागाचे पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झलके, छिंदवाड्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज राय यांची संयुक्त बैठक संसर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नागपूर व अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला.नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात येत्या ११ एप्रिल रोजी निवडणूक होणार असून या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीमावर्ती राज्यातून होणारी अवैध वाहतूक तसेच मतदानापूर्वी अवैधपणे होणारी दारू, पैसा तसेच असामाजिक तत्त्वांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासंदर्भात मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात कायमस्वरुपी तपासणी पथके तैनात ठेवण्यासोबतच दोन्ही राज्याच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. दोन्ही राज्यातील सीमेवरील तपासणी नाक्यावर २४ तास तपासणीसाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. हा बंदोबस्त निवडणुकीपूर्वी म्हणजे ८ ते ११ एप्रिलपर्यंत ठेवण्यात येईल. त्यानंतर छिंदवाडा जिल्ह्यात २९ एप्रिल रोजी होणाºया मतदानापर्यंत कायम ठेवण्याबाबतही दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमध्ये संमती झाली आहे.सावनेर तालुक्यात केळवद, चिरोंजी, खुसार्पार येथे २४ तास पेट्रोलिंग तसेच प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येईल. रामटेक तालुक्यातील कोलितमारा, मानेगाव टेक (जबलपूर), भंडारबोडी (भंडारा) येथे तर काटोल तालुक्यातील उमरीकला, राजुरा, लांगा-करवार-पिंपळाकोठा व वडचीटोली (चौरखवरी) येथे तपासणी पथके तैनात राहणार आहेत. दोन्ही राज्यातील अधिकारी अवैध वाहतूक तसेच तपासणीसाठी समन्वयाने काम करणार असल्याचेही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.यावेळी छिंदवाडा येथील अपर जिल्हाधिकारी कविता बादला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशांक गर्ग, रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, सावनेरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, अमरावती विभागाचे श्रीकांत तरवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनीही अमरावती तसेच नागपूर जिल्ह्यातील आंतरराज्य सीमेवर तपासणी पथके तयार करुन सर्व वाहनांची या काळात तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.मतदानाच्या दिवशी दोन्ही राज्यांच्या सीमा सिल करणारलोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात असामाजिक तत्त्वाविरुद्ध कठोर कारवाई करणे तसेच तडीपार व आवश्यक असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध दोन्ही जिल्ह्यातील अधिकारी परस्पर समन्वयाने संयुक्त कारवाई करतील. अवैधपणे दारुची निर्मिती व वाहतूक पूर्णपणे थांबविण्यासाठी संयुक्त तपासणी करण्यात येईल. तसेच वन विभागातून जाणाऱ्या रस्त्यांवरही पेट्रोलिंग वाढविण्यात येईल. आंतरराज्य चेकपोस्टवर पोलीस विभाग तसेच उत्पादन शुल्क विभागातर्फे तपासणी करण्यात येऊन मतदानाच्या दिवशी सीमा सिल करण्यात येईल. असाही या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliceपोलिस