लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमेश्वर ब्राह्मणी नगरपालिकेचे नगर अभियंता देवदत्त नागदेवे यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कळमेश्वर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमेश्वर तालुक्यात आदर्श आचारसंहिता प्रकरणी सरकारी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.रामटेक लोकसभा मतदारसंघाचे भरारी पथक प्रमुख मनोज नेमाजी शहारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी देवदत्त नागदेवे यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. प्राप्त माहितीनुसार नगर परिषद कळमेश्वर ब्राह्मणी यांच्याकडून आदर्श आचारसंहितेचे नियमाचे उल्लंघन होत असल्याबाबतचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले. नागदेवे यांनी आदर्श आचारसंहितेनंतर कळमेश्वर ब्राह्मणी नगरपालिका क्षेत्रांतर्गत नवीन बांधकाम करून निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघनासाठी जबाबदार असल्याची लेखी तक्रार भरारी पथक प्रमुख मनोज शहारे यांनी २० मार्च रोजी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे दिल्यावरून गुन्हा क्रमांक २२०/१९ कलम १८८ भारतीय दंड संहितानुसार कळमेश्वर पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास ठाणेदार मारुती मुळक यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश खंडाते करीत आहे.
Lok Sabha Election 2019; नागपूर जिल्ह्यातील नगर अभियंत्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:00 AM
कळमेश्वर ब्राह्मणी नगरपालिकेचे नगर अभियंता देवदत्त नागदेवे यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कळमेश्वर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देनवीन बांधकामाला केली सुरुवात भरारी पथकाची तक्रार