शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

Lok Sabha Election 2019; नागपूर व रामटेकचे उमेदवार म्हणतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:21 AM

नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी जनसामान्यांसाठी ते काय करणार आहेत, याविषयी जे मनोगत व्यक्त केले ते थोडक्यात देत आहोत..

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी जनसामान्यांसाठी ते काय करणार आहेत, याविषयी जे मनोगत व्यक्त केले ते थोडक्यात देत आहोत..जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारमी निवडणुकीसाठी अर्ज भरत असताना नागपूरच्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, हे एकाप्रकारे त्यांचे माझ्यावरील प्रेमच आहे. मागील वेळेपेक्षा माझा विजय जास्त मताधिक्याने होईल असा मला विश्वास आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात रालोआला प्रचंड बहुमत मिळेल व मागील वेळपेक्षा जास्त जागांवर आमचा विजय होईल. जनतेने मला समर्थन दिले यासाठी त्यांचे आभार. त्यांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा व विकासाच्या आशा आहेत, त्या मी पूर्ण करेल.- नितीन गडकरी, भाजपा उमेदवार, नागपूरलोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठलोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारंवार काँग्रेसबद्दल मतभेद असल्याबाबत गैरप्रचार करण्यात आला होता. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही. गेल्या पाच वर्षांतच विकास झाला, असे चित्र निर्माण केले जात आहे. आज सर्व कार्यक र्ते जोमाने कामाला लागले आहेत. काँग्रेस आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्याने ताकद वाढली आहे. लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ असतो.- नाना पटोले, काँग्रेस उमेदवार, नागपूरआपले कामच बोलणारमागील पाच वर्षांत आम्ही रामटेक मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले काम जनतेने पाहिले आहे. त्यामुळे निवडणुकांत ते कामच बोलेल व जनता परत शिवसेना-भाजप महायुतीवरच विश्वास टाकेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जनतेपर्यंत आम्ही जात आहोत. रामटेकच काय पण राज्यात महायुतीला अपेक्षेहून जास्त जागा मिळतील.- कृपाल तुमाने, शिवसेना उमेदवार, रामटेकशेतकरी, बेरोजगारी विकास हेच मुद्देविकासाच्या अनेक गोष्टी केल्या जातात. परंतु रामटेकमध्ये कुठेच विकास दिसत नाही. शेतकरी, बेरोजगारी आणि विकास हेच आपले प्रमुख मुद्दे राहतील. रामटेकमध्ये केवळ शिवसेना आणि काँग्रेस अशी थेट लढत राहील. सेनाबद्दल प्रचंड विरोध आहे, ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे.-किशोर गजभिये, काँग्रेस उमेदवार, रामटेकविकास नव्हे गती झालीआमची लढत थेट भाजपसोबत आहे. भाजप विकास होत असल्याचे सांगते. परंतु गतीने विकास होण्याऐवजी विकासाचीच गती झाली आहे. या विकासाने नागरिकांची वाट लावली असून, हेच आपल्या प्रचाराचे मुद्दे राहतील.- मो. जमाल, बसपा उमेदवार, नागपूरबेरोजगारी विकास हाच मुद्दारामटेक हे मोठे क्षेत्र आहे. या शहराचा विकासच झालेला नाही. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. विकास आणि बेरोजगारी हे आपल्या प्रचाराचे दोन मुख्य मुद्दे राहतील. हे मुद्दे घेऊनच आम्ही जनतेसमोर जाऊ.सुभाष गजभिये, बसपा उमेदवार, रामटेकआम्हीच देणार सक्षम पर्यायजनता आता काँग्रेस आणि भाजपला त्रासली आहे. त्यामुळे आता जनतेला वंचित बहुजन आघाडीच्या रूपात नवा सक्षम पर्याय आम्ही निर्माण करून दिला आहे. त्यामुळे जनता आम्हालाच साथ देईल.- सागर डबरासे, वंचित बहुजन आघाडी, उमेदवार, नागपूरबेरोजगारीसह अनेक मुद्देरामटेकमध्ये बेरोजगारीसह अनेक स्थानिक मुद्दे आहेत. विकासाच्या नावावर केवळ बोंब आहे. बंद केलेल्या शाळा, महिलांना नि:शुल्क शिक्षण आदी मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊ. आमची थेट लढतशिवसेनेसोबतच राहील.- किरण पाटणकर-रोडगे, वंचित बहुजन आघाडी, उमेदवार, रामटेक

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक