शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

Lok Sabha Election 2019; नागपुरात नऊ हजारावर पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:43 AM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तब्बल ८ ते ९ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देभूषणकुमार उपाध्यायअसामाजिक तत्त्वांची यादी तयार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तब्बल ८ ते ९ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रपरिषदेत दिली.डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, तब्बल ६ हजार पोलीस कर्मचारी, १ हजार पोलीस अधिकारी, १५०० होमगार्ड तैनात राहतील. यासोबतच सीआरपीएफच्या दोन कंपनीही देण्यात आलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात फ्लॅग मार्च काढण्यात येईल. निवडणुकीमध्ये जी असामाजिक तत्त्वांची मंडळी गडबड करू शकतात अशा लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. यासोबतच इतर संवेदनशील लोकांविरुद्धही कारवाई केली जाणार आहे. वॉण्टेड लोकांची यादी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. तसेच गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.

१२५ ठिकाणी अचानक होणार नाकेबंदीनागपुरातील १२५ ठिकाणे अशी निश्चित करण्यात आली आहेत. जिथे वाहतूक आणि पोलीस विभाग मिळून अचानक नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करतील. जेणेकरून दारूचा साठा किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर काही अवैध कृत्य होऊ नयेत.

नागपूर सीमेवर अतिरिक्त सुरक्षा पथकनागपूर जिल्ह्याला लागून मध्य प्रदेशची सीमा आहे. निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेशातून नागपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा होता कामा नये किंवा मतदानाच्या दिवशी तिकडील लोक इकडे येता कामा नये, यासाठी सीमवेर अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यात येईल. तसेच विशेष पथक नियुक्त करण्यात येणार असून १३ तारखेला दोन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९