ठळक मुद्देपक्षचिन्हांच्या दुपट्ट्यांनी सजले बाजार
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: निवडणुकांचे बिगुल वाजताच वातावरणात एक वेगळाच जोश भरलेला आहे. या जोशाला अधिक वाढवण्याचे व टिकवण्याचे काम बाजारात आलेल्या पक्षचिन्हांच्या दुपट्ट्यांनी केले आहे. निवडणूक म्हटलं की पक्षनिष्ठा आलीच. ती निवडणुकीत जपलीही जाते. नेत्यांच्या प्रचारासाठी गळ््यात पक्षाचे चिन्ह असलेला दुपट्टा, शेला किंवा उत्तरीय हे आवश्यकच असते. त्याविना कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा हे कसे ओळखू येणार? शिवाय त्यातून एकजुटीची भावनाही वाढते. नागपुरात ११ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांचे दुपट्टे विक्रीस आले आहेत.