शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

Lok Sabha Election 2019; नागपूरलगतच्या जिल्हा सीमांवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:02 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्याला लागून असलेल्या राज्य सीमा सील करण्यात आलेल्या आहेत.

ठळक मुद्देनिवडणुकीसाठी आठ नाके सीलपोलिसांचा कडक बंदोबस्तइतर जिल्ह्यांमधून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्याला लागून असलेल्या राज्य सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. आता जिल्ह्यांतर्गत सीमाही सील करण्यात आल्या असून यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नागपूर जिल्ह्याला लागून मध्यप्रदेशची सीमा आहे. निवडणुकीच्या काळात मध्यप्रदेशातून नागपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा होता कामा नये किंवा मतदानाच्या दिवशी तिकडील मतदार इकडे येता कामा नये, यासाठी सीमेवर अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यात येत आहे. कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या संदर्भात दोन्ही जिल्ह्यातील पोलीस आणि जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांची बैठकसुद्धा आहे. आता याच धर्तीवर जिल्हास्तरीय सीमासुद्धा सील करण्यात आल्या आहेत.नागपुरात आठ नाके आहेत. यामध्ये वाडी, हिंगणा, काटोल, दिघोरी, खापरी, कामठी, कोराडी आणि पारडी नाक्याचा समावेश आहे. आठही नाक्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. निवडणुकीच्या काळात अवैधपणे दारू, पैसा आदी मोठ्या प्रमाणावर येत असतात. ते रोखण्यासाठी जिल्ह्यात दाखल होणारे प्रत्येक वाहन तपासले जात आहे. एकूणच जिल्हा सीमेवरील नाक्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.नाक्यानंतरही नाकेबंदीनागपूर जिल्ह्यातील नाक्यांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहेच. परंतु नाक्यापासून थोड्या दूर अंतरावर शहरामध्ये पुन्हा नाकेबंदी करण्यात येत आहे. जेणेकरून एखादे वाहन नजर चुकवून नाक्यावरून निसटले तरी नाकेबंदीमध्ये ते सापडले जातील, असा याचा उद्देश आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक