शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Lok Sabha Election 2019; सभेचे दर्दी करतील का मतदानाला गर्दी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 10:40 AM

सोशल मीडियावर तर खाली खुर्च्या दाखविण्याची होडच लागली आहे. पण या सभेचे दर्दी करतील का मतदानाला गर्दी? हा राजकीय विश्लेषकांसाठी चिंतनाचा विषय ठरत आहे.

ठळक मुद्देसभेच्या गर्दीवर कार्यकर्त्यांच्या फुशारक्यासभेत खुर्च्या रिकाम्या दाखविण्याची होड

मंगेश व्यवहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा रणसंग्राम सुरू झाला आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचारसभेच्या फैरी झडत आहेत. पण या सभा खऱ्या अर्थाने गाजत आहेत, त्या गर्दीवरून. कुणाच्या सभेत किती खुर्च्या खाली, कुणाच्या सभेत किती गर्दी झाली यावर कार्यकर्त्यांच्या फुशारक्या मारणे सुरू आहे. सोशल मीडियावर तर खाली खुर्च्या दाखविण्याची होडच लागली आहे. पण या सभेचे दर्दी करतील का मतदानाला गर्दी? हा राजकीय विश्लेषकांसाठी चिंतनाचा विषय ठरत आहे.नुकतीच वर्धा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा भरदुपारी झाली. सभेचे मैदान रिकामे असल्याचे फोटो व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेअर झाले. रिकाम्या खुर्च्यांवरून काँग्रेस, राष्ट्रवादीचे मोदी लाट ओसरल्याचा आव आणू लागले. दुसऱ्याच दिवशी भंडारा गोंदिया मतदारसंघात मोदींच्या झालेल्या सभेत भरभरून गर्दी झाली आणि सोशल मीडियावर परत भाजपा कार्यकर्त्यांनी ‘अबकी बार फीर मोदी सरकार...’ अशी बतावणी सुरू झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात सभा घेतली. संघाच्या भूमीत राहुल गांधीच्या सभेवर विशेष लक्ष लागले होते. नाही-नाही म्हणता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अपेक्षेपेक्षा उत्स्फूर्त गर्दी जमवली. पण भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यातही रिकाम्या खुर्च्या शोधल्या. गडकरींच्या विधानसभानिहाय होत असलेल्या सभाही गाजत असल्या तरी काँग्रेस कार्यकर्ते त्यातूनही रिकाम्या खुर्च्या शोधून सोशल मीडियावर गडकरी संकटात असे भासवित आहेत.सोशल मीडियावर कार्यकर्त्यांच्या या फुशारक्या अ‍ॅन्टी प्रचाराचे एक माध्यम झाले आहे. भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळवून आपले नेते किती भारी याचा देखावा करीत आहेत.

मतदारांचा कौल निर्धारित करता येत नाहीटीव्ही आणि सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे राष्ट्रीय नेत्यांचा क्रेझ जनतेमध्ये राहिला नाही. नेत्यांच्या प्रचार सभेत झालेली गर्दी अथवा राहिलेल्या रिकाम्या खुर्च्या याचा मतदानाशी काही संबंध नाही. शहरी आणि जागरुक मतदार सभेच्या भानगडीत पडतच नाही. गर्दी जमविणे ही राजकीय पक्षाची हातोटी असते. ऐनकेनप्रकारे नेत्यांच्या सभेला कशी गर्दी दिसेल हा त्यांचा प्रयत्न असतो. पण सभेच्या गर्दीवरून अथवा खाली खुर्च्यावरून मतदारांचा कौल निर्धारित करता येत नाही.-डॉ. मोहन काशीकर, विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019