अभी थाली आनी बाकी है...! पंतप्रधान मोदींनी १० वर्षांचं काम सांगून दिलं नवं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 08:02 PM2024-04-10T20:02:57+5:302024-04-10T20:19:25+5:30
Pm Narendra Modi: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
Pm Narendra Modi: लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सर्व पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रामटेक लोकसभा मतदारसंघात सभेसाठी उपस्थित होते. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
रामटेक येथील जाहीर सभेत बोलताना पीएम मोदी म्हणाले, I.N.D.I आघाडी समाजात वाद लावण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. ते फक्त देशाचे विभाजन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण त्यांना माहित आहे की देशातील जनता एकसंध राहिली तर त्यांचे राजकारण संपेल.
...तर संविधान पूर्ण देशात लागू करण्याची हिंमत का केली नाही?; PM नरेंद्र मोदी कडाडले
१९ एप्रिल रोजी जनतेने फक्त खासदार निवडायचे नाही तर पुढील १००० वर्षे देशाचा पाया मजबूत करण्यासाठी मतदान करायचे आहे. गेल्या १० वर्षात अनेक विकासकामे झाली. हा फक्त ट्रेलर आहे. गेल्या १० वर्षात केलेले काम फक्त ऐपेटाइझर आहे. मेन कोर्स अजून बाकी आहे, असंही पीएम मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, रामटेक हे ठिकाण आहे जिथे भगवान श्री रामाचे पाऊल पडले होते. एनडीएचा बंपर विजय दिसून येत असल्याचे सर्वेक्षणात दिसून येत आहे. पण मी म्हणतो, जेव्हा मोदींविरोधात शिवीगाळ वाढेल तेव्हा समजून घ्या की हा ट्रेंड पुन्हा एकदा मोदी सरकारचा आहे, असंही मोदी म्हणाले.
#WATCH | PM Modi in Maharashtra's Ramtek says, "The work I have done in the last 10 years is an appetiser, Thali aani baaki hai...I give you a guarantee - 'Har pal desh ke naam, har pal aap ke naam'; 24 by 7 for 2047..." pic.twitter.com/JV7pNXWEdl
— ANI (@ANI) April 10, 2024
जम्मू आणि काश्मीरमध्ये घटनात्मक अधिकार मिळाले
पीएम मोदी म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष म्हणतात की मोदी जिथे जातात तिथे ३७० बद्दल बोलत राहतात. ते म्हणतात, कलम ३७० हटवल्याने देशाला काय फायदा झाला? काँग्रेसच्या दलित, आदिवासी, महिलाविरोधी आणि व्होट बँकेच्या राजकारणाचा हा जिवंत पुरावा आहे. कलम ३७० मुळे या सर्व कलमांना जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच घटनात्मक अधिकार मिळाले आहेत.