महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 01:02 PM2024-06-03T13:02:26+5:302024-06-03T13:13:38+5:30

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या समोर येणार आहेत.

Lok Sabha Election 2024 We will win more than 35 seats in Maharashtra Vijay Vadettiwar's big claim before the verdict | महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या ४ जून रोजी समोर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले. या पोलमध्ये एनडीए पुन्हा देशात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, आता राजकीय नेत्यांकडून निकालाआधी दावे करण्यात येत आहेत.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निकालाआधी मोठा दावा केला आहे. 

एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?

महाराष्ट्रातील निकाल स्पष्ट आहे, एक्झिट पोलने दाखवलेल्या जागेपेक्षाही आम्ही राज्यात पुढे आहे. ३० जागांपेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. "दोन दिवसापूर्वी आलेला सर्वे भंकस होता, यामध्ये काही तथ्य नाही. कालचा सर्वे सत्ताधाऱ्यांना खूष करणारा होता. तो खुरचीवरुन जोपर्यंत जात नाहीत, तोपर्यंत ते त्यांची बाजू घेत राहतील, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. आता ते खुरचीवरुन जाण्याची वेळ जवळ आली आहे. आम्ही महाराष्ट्रात ३५ जागांच्या पुढे जागा जिंकू, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

"सरकारविरुद्ध एवढ वातावरण असुनही जर त्यांच्या बाजूने निकाल लागला तर मात्र दाल में कुछ काला है, असंही वडेट्टीवार म्हणाले. आमच्या सर्वेनुसार देशात इंडिया आघाडी २९५ जागांपर्यंत जाईल, सन्यास कुणाला घ्यायचं आहे ते उद्या कळेल, असंही वडेट्टीवार म्हणाले. 

विजय वडेट्टीवार म्हणाले, मतमोजणीवेळी आम्ही सगळीकडे लक्ष ठेऊन आहे. अंतिम निकाल येईपर्यंत बाहेर पडू नका असं आम्ही आमच्या लोकांना सांगितलं आहे. मत मोजणीआधी ईव्हीएममध्ये झालेलं मतदान आणि आमच्याकडे सी सेव्हन फॉर्ममधील मतदान हे तपासून ते बरोबर असेल तर मतमोजणीला सुरुवात करायची असी सूचना आम्ही उमेदवारांना दिल्या आहेत. एक तास लेट झाला तरीही ही प्रोसेस करायची अशी आमची मागणी असेल, असंही वडेट्टीवार म्हणाले. 

पोलचे आकडे आले समोर

रिपब्लिक-PMARQ च्या एक्झिट पोलनुसार देशात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनजीएला ३५९ आणि इंडिया आघाडीला १५४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला २७ ते ३२ आणि महाविकास आघाडीला १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना एक जागा मिळू शकते. 

Web Title: Lok Sabha Election 2024 We will win more than 35 seats in Maharashtra Vijay Vadettiwar's big claim before the verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.