लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधील असंतुष्ट गटाने लोकसभेच्या उमेदवारीसाठी दिल्लीत फिल्डिंग लावली असताना दुसरीकडे मुत्तेमवार- विरोधी ठाकरे गटाने उमेदवारी आपल्याच गटाकडे कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शहर काँग्रेसने शुक्रवारी लोकसभेचा उमेदवार शहर काँग्रेस मार्फतच ठरावा, असा ठराव घेतला. संबंधित ठराव प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळू नये, यासाठी विरोधी गट सक्रिय झाला आहे. दिल्लीत वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेऊन ते आपली बाजू मांडत आहेत. अशातच आता मुत्तेमवार- ठाकरे गटाने शहर काँग्रेसच्या संमतीनुसार उमेदवार ठरावा, असा ठराव घेऊन असंतुष्ट गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. बैठकीत ठाकरे म्हणाले, शहर काँग्रेसतर्फे बूथ कमिट्या तयार करण्यात आल्या आहेत. स्वत:च्या प्रसिध्दीकरिता काही नेते पक्षांच्या कार्यकर्त्यांचे पाठबळ नसतानाही लोकसभेच्या उमेदवारीवर दावा करीत आहेत. मात्र, लोकसभेचा उमेदवार शहर काँग्रेस समिती मार्फत शिफारस केलेलाच असावा. अशा आशयाचाप्रस्ताव त्यांनी मांडला. यावर उपस्थित पदाधिकारी यांनी लोकसभेसाठी सक्षम, कुशल व अनुभवी व्यक्ती असायला पाहिजे, असे मत व्यक्त केले व ठराव मंजूर केला.बैठकीत जनसंपर्क अभियानाची माहिती देण्यात आली. १८ ते २१ वयोमर्यादेच्या युवकांना लक्षात घेऊन पक्ष सदस्यता अभियान राबविणे. स्थानिक परिस्थिती आणि माहितीचे संकलन करणे. प्रत्येक बूथवर बूथ सहयोगी तयार करणे. पक्षाकरिता निधी संकलन करणे. या सर्व बाबी राबविण्याकरिता शहरातील सहाही विधानसभानिहाय एकूण ३१ लोकांची कमिटी स्थापन करण्याचे निर्देश दिले. बैठकीला अॅड.अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, उमेश शाहू, संजय महाकाळकर, बंडोपंत टेभुर्णे, प्रा.दिनेश बानाबाकोडे, डॉ.गजराज हटेवार, जयंत लुटे, राजेश कुभलकर, राजू गोतमांगे आदी उपस्थित होते.विशाल मुत्तेमवार चंद्रपूरचे प्रभारीकाँग्रेसच्या चंद्रपूर शहर आणि जिल्हा प्रभारीपदी युवा नेते विशाल मुत्तेमवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी विविध राज्यातील निवडणुकीत पक्षातर्फे सोपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घ्याव्या, जनसंपर्क अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावर सोपविली आहे. यापूर्वी जिल्हाप्रभारी म्हणून नेमण्यात आलेले शकूर नागाणी यांच्यासह विशाल यांना आता संयुक्तपणे काम करायचे आहे.
लोकसभेचा उमेदवार नागपूर शहर काँग्रेस मार्फत ठरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:42 PM
लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधील असंतुष्ट गटाने लोकसभेच्या उमेदवारीसाठी दिल्लीत फिल्डिंग लावली असताना दुसरीकडे मुत्तेमवार- विरोधी ठाकरे गटाने उमेदवारी आपल्याच गटाकडे कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शहर काँग्रेसने शुक्रवारी लोकसभेचा उमेदवार शहर काँग्रेस मार्फतच ठरावा, असा ठराव घेतला. संबंधित ठराव प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
ठळक मुद्देबैठकीत ठराव : प्रदेश काँग्रेसला पाठविणार