लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदानाचा तिसरा टप्पा उद्या म्हणजेच मंगळवारी (07 मे) पार पडणार आहे. या टप्प्यात जेथे-जेथे मतदान होणार आहे, तेथील निवडणूक प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी थंडावल्या. मात्र इतर ठिकाणी राजकीय पक्षांच्या सभा आणि नेत्यांची भाषणे सुरूच आहेत. यातच आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला. राहुल गांधी राजकारणाचे महान शास्त्रज्ञ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गुवाहाटीमध्ये प्रसारमाध्यमांसोबत बोलताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "राहुल गांधी पुढची निवडणूक पाकिस्तानातून जिंकतील आणि चांगल्या फरकाने जिंकतील. गांधींनी त्यांच्या मूळ देशात जाऊन निवडणूक लढायला हवी, ही अभिमानाची गोष्ट असेल. कदाचित राहुल गांधी पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेत मदत करू शकतील. ते एक मोठे राजकीय वैज्ञानिक आहेत आणि बुद्धीबळाचे खेळाडू आहेत."
तत्पूर्वी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी वायनाडच्या जनतेला विचारले होते की, राहुल गांधींकडे तेथे (वायनाड) एखादे घर आहे? राहुल गांधी मोबाइल नंबर आहे? त्यांनी कधी वायनाडमधील लोकांसोबत बसून भोजन केले?
'राहुल गांधी एखाद्या टूरिस्ट प्रमाणे वायनाडला जातात' - हिमंता म्हणाले, “एका खासदाराने आपल्या मतदारसंघात किमान महिन्यातून दोन-तीन दिवसतरी जायला हवे. मात्र सभेचे नियम पाहता असे वाटते की, राहुल गांधी केवळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अथवा एखाद्या वार्षिक दौऱ्यावर जातात. जे एखाद्या टूरिस्टसारखे वाटते.”
सीएम सरमा म्हणाले, राहुल गांधींची क्रिया एखाद्या चांगल्या पर्यटकाप्रमाणे आहे. मात्र, चांगल्या खासदाराप्रमाणे नाही. ते जर वायनाडचे खासदार असते, तर किमान त्यांचा मोबाईल नंबर तरी काही लोकांना माहीत असला असता. त्यांचे त्यांचे घरही असले असते. मला जे जाणवले ते मी सांगितले."