शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

लोकसभा नागपूर १९८४; अपक्षांच्या भाऊगर्दीत प्रस्थापित पक्षांचीच सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:11 AM

१९८४ च्या निवडणुका दोन कारणांसाठी चर्चेत राहिल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसबाबत देशभरात सहानुभूतीची लाट होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: १९८४ च्या निवडणुका दोन कारणांसाठी चर्चेत राहिल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसबाबत देशभरात सहानुभूतीची लाट होती. निवडणुकांत इतर सर्व मुद्दे बाजूला पडले होते. तर दुसरीकडे प्रथमच निवडणुकांमध्ये अपक्षांचे प्रमाण हे २०हून अधिक दिसून आले. अनेक हौसे गवसेदेखील निवडणुकीत उतरले होते. मात्र अपक्षांच्या भाऊगर्दीत ९५ टक्क्यांहून अधिक मते ही तीन प्रस्थापित पक्षांच्याच पारड्यात गेली होती. मतदारांनी परत एकदा कॉंग्रेसवर विश्वास टाकला व बनवारीलाल पुरोहित हे पहिल्यांदाच लोकसभेत गेले.१९८० ते १९८४ या कालावधीत देशात अनेक स्थित्यंतरे घडली. महाराष्ट्रात बॅ.अंतुले यांना तर न्यायालयीन आदेशानंतर राजीनामा द्यावा लागला होता.१९८४ साली इंदिरा गांधी यांची आॅक्टोबर महिन्यात हत्या झाली व डिसेंबर महिन्यात राजीव गांधी यांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. विदर्भात कॉंग्रेसचे संघटन आणखी मजबूत झाले होते. कॉंग्रेसने बनवारीलाल पुरोहित यांना तिकीट दिले. तर खोरिपातर्फे श्याम खोब्रागडे यांनी अर्ज भरला होता. १९८० च्या निवडणुकीतदेखील श्याम खोब्रागडे हे उभे होते व ते दुसऱ्या स्थानी आले होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना जास्त अपेक्षा होत्या. तर भाजपातर्फे रामप्रकाश आहुजा हे मैदानात होते. भाजपाने पहिल्यांदाच नागपुरात आपला उमेदवार उतरविला होता. याशिवाय चंद्रकांता कांबळे, दिनकर बेंडेकर, टिकाराम पेंदाम, महेश पुरोहित, रामरतन जानोरकर, विठ्ठलदास दिवेचा, आनंदराव कुबेटकर, एन.एल.राव, कामरान खान, प्रकाश चाफले, प्रमोद पटेल, हरिभाऊ तभाने, रमण मूर्ती, भगवंतसिंह भसिन, अरविंद जोहरापुरकर, नत्थू शोरटे, राहुल रामटेके, शब्बीर अहमद, मुकुंद गजवे, बाळासाहेब अग्ने, विठ्ठलराव मासुरकर हे २२ अपक्षदेखील निवडणुकीत उतरले होते.अपेक्षेप्रमाणे बनवारीलाल पुरोहित जिंकून आले. त्यांना ५२.९९ टक्के मते प्राप्त झाली. तर श्याम खोब्रागडे हे २९.४१ टक्के मतांसह परत दुसऱ्या स्थानी राहिले. १९८० च्या तुलनेत त्यांना मिळालेल्या मतांमध्ये मात्र तीन टक्क्यांची वाढ झाली. भाजपाचे रामप्रकाश आहुजा हे १४.१५ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानी होते. या तीन उमेदवारांना मिळून ९६.५५ टक्के मते होती. तर २२ अपक्षांच्या पदरी केवळ ३.४५ टक्के मते आली.

काँग्रेसने विदर्भाचा बालेकिल्ला राखलाइंदिरा गांधी आपल्या मृत्यूच्या सात दिवस अगोदर विदर्भाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. २३ आॅक्टोबर रोजी त्या नागपुरात आल्या व तेथून चंद्रपूर जिल्ह्यातील सुपर थर्मल पॉवर स्टेशनच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गेल्या होत्या. ‘आज भारतावर विविध बाजूंनी संकटे येत आहेत. बाहेरच्यापेक्षा घरातून होणारी कटकारस्थाने जास्त धोकादायक आहे व हीच चिंतेची बाब आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी या शक्तींसोबत शेवटपर्यंत लढेल असे त्या चंद्रपुरात म्हणाल्या होत्या. त्यानंतर सातच दिवसात ३१ आॅक्टोबर रोजी राजधानीत त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी त्यांची हत्या केली होती. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर देशात एक सहानुभूतीची लाट आली. विदर्भात तर कॉंग्रेसला सर्वच्या सर्व जागा मिळाल्या व कॉंग्रेसचा बालेकिल्ला ही ओळख या क्षेत्राने कायम ठेवली.

टॅग्स :Banvarilal Purohitबनवारीलाल पुरोहित