शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

लोकमतचा प्रभाव : नागपुरात  १.४९ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 8:16 PM

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) धाडीत १ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आणि ट्रान्सपोर्ट गॅरेजला सील ठोकण्यात आले.

ठळक मुद्देएफडीएची कारवाई : धडक कारवाई सुरू राहणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) धाडीत १ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आणि ट्रान्सपोर्ट गॅरेजला सील ठोकण्यात आले.एनडीएच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त माहितीच्या आधारे गोपला कॉम्प्लेक्स, खदान रोड, वाडी येथील एस.टी.सी. लॉजिस्टिक या ट्रान्सपोर्ट गॅरेजची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ सुगंधित तंबाखूचा (विना लेबल निळे पॅकेट) २४८ किलो वजनाचा १,४८,८०० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू वाहतुकीसाठी साठविलेला आढळून आला. या साठ्यातून नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. उर्वरित साठा अन्न सुरक्षा व मानद कायद्यातील तरतुदींनुसार जप्त करून अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर कार्यालयात जमा करण्यात आला आहे.ट्रान्सपोर्टचे मालक सुभाष मोहनलाल बिश्नोई व कैलासचंद कानाराम बिश्नोई हे असून त्यांनी आपल्या ट्रान्सपोर्ट गॅरेजमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा वाहतुकीसाठी साठविल्याने सदर ट्रान्सपोर्ट गॅरेज सिलबंद करण्यात आले आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन, नागपूर येथील सहायक आयुक्त (अन्न) शरद कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम व महेश चहांदे तसेच नमूना सहायक अरूण सौदे यांनी केली.जनआरोग्याचा विचार करता याप्रकारची धडक मोहीम यापुढेही सुरू राहील. गुटखा, पानमसाला, सुगंधित व स्वादिष्ट तंबाखू व सुपारी व खर्रा इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थांचे उत्पादन, वितरण, साठवणूक व विक्री होत असल्याचे आढळल्यास त्याबाबत प्रशासनाला माहिती देऊन गुटखाबंदी प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी सहकार्य करावे आणि जनतेने विशेषत: युवा वर्गाने अशा प्रकारचे सेवन करून नये, असे शरद कोलते यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागraidधाड