लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीची परीक्षा सुरू झाली. काही केंद्रांवर कॉपी होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. या तक्रारींची नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. नागपूर विभागीय कार्यालयाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सर्व भरारी पथकांच्या प्रमुखांना पत्र पाठवून परीक्षा केंद्रांना भेटी देऊन कॉपीचे प्रकार रोखण्याचे निर्देश दिले आहेत. सोबत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचत्या सूचनाही दिल्या आहेत.बोर्डाची बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर होता. या पेपर दरम्यान कॉपीचे प्रकार झाल्याच्या तक्रारी होत्या. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी विभागात कॉपीवर आळा घालण्यात आल्याचा दावा केला होता. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष देशपांडे यांनी भरारी पथकांना संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुपारनंतर सर्व पथकाच्या प्रमुखांना पत्र पाठविण्यात आले. देशपांडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, बोर्डाने परीक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे. कॉपीला आळा घालण्यासाठी व्यापक प्रमाणात तयारी केली आहे. त्यासाठी भरारी पथक नेमले आहेत. या पथकांना परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी अधिकाधिक परीक्षा केंद्राचे निरीक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.परीक्षा अगदी सुरळीत पार पडलीनागपूर : परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याच केंद्रावर कोणत्याही प्रकारच्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका कमी पडल्या नाहीत. तसेच उत्तर पत्रिका व प्रश्नपत्रिका कमी पडल्याच्या तक्रारी आमच्या कार्यालयास प्राप्त झाल्या नाहीत. साहित्याची मागणी विभागीय मंडळाकडे प्राप्त झाली नाही किंवा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या आहेत. सर्व केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली आहे. रविकांत देशपांडे,अध्यक्ष, नागपूर विभागीय मंडळ
लोकमत इम्पॅक्ट : परीक्षा केंद्रावर जा, कॉपी रोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 10:12 PM
बारावीची परीक्षा सुरू झाली. काही केंद्रांवर कॉपी होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. या तक्रारींची नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. नागपूर विभागीय कार्यालयाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सर्व भरारी पथकांच्या प्रमुखांना पत्र पाठवून परीक्षा केंद्रांना भेटी देऊन कॉपीचे प्रकार रोखण्याचे निर्देश दिले आहेत. सोबत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचत्या सूचनाही दिल्या आहेत.
ठळक मुद्देबोर्डाच्या विभागीय अध्यक्षांचे आदेश : भरारी पथकांना दिले पत्र