विजय दर्डा यांनी केले सन्मानित‘लोएस्ट लिंबो स्केटिंग ओवर १० मीटर्स’मध्ये गिनीज बुक प्रमाणपत्र मिळालेनागपूर : आपल्या प्रतिभेच्या बळावर ‘लोएस्ट लिंबो स्केटिंग ओवर १० मीटर्स’मध्ये १६.५ सें.मी.(६.५ इंच)चा विश्वविक्रम बनविणारी सृष्टी शर्माला लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी सन्मानित केले. सृष्टीने या खेळातील जगभरातील विक्रमांना मोडत गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये जागा मिळवली. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रिकॉर्डस्चे प्रमाणपत्र खा. विजय दर्डा यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात सृष्टीला प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सृष्टीचे आई-वडील धर्मेंद्र व शिखा, बहीण सिद्धी आणि प्रशिक्षक राकेश शर्माही उपस्थित होते. खा. विजय दर्डा यांनी सृष्टीला आशीर्वाद दिले आणि तिच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. खा. दर्डा म्हणाले, ही फारच आनंदाची गोष्ट आहे. इतक्या कमी वयात सृष्टीने असामान्य कर्तृत्व केले आहे. सृष्टीची मोठी बहीण सिद्धी जी रोलर हॉकीमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळली आहे तिलाही खा. दर्डा यांनी शुभेच्छा दिल्या. या आनंदाच्या क्षणी लोकमत आपल्या सोबत असून या दोन्ही मुलींचे भविष्य उज्ज्वल व्हावे, असे आशीर्वादही खा. दर्डा यांनी याप्रसंगी दिले. लोकमत भवनात झालेल्या या कार्यक्रमाला लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांच्यासोबतच लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह, लोकमत समाचारचे प्रोडक्ट हेड मतीन खान, उपमहाव्यवस्थापक आशिष जैन, नितीन नौकरकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)विक्रमापर्यंत पोहचण्यासाठी लोकमतचा मोठा संघर्षगिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये सृष्टीचे नाव समाविष्ट व्हावे, यासाठी लोकमतला मोठा संघर्ष करावा लागला.लोकमतने सृष्टीला गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्च्या प्रक्रियेपर्यंत नेण्यासाठी मागच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये संपर्क केला. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्च्या सर्व निकषांवर खरे उतरण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली. झाशी राणी चौकातील माहेश्वरी भवनात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या रोमांचकारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकमतने गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्च्या मापदंडानुसार सर्व कागदपत्रे तयार केली व ती गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्चे कार्यालय असलेल्या इंग्लंडपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली. नियमानुसार या विक्रमाचे साक्षीदार असलेल्या मान्यवरांची नावेही पाठविण्यात आली. ज्यात लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांचे नावसुद्धा होते. या विक्रमाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगची सीडीही इंग्लंडला पाठविण्यात आली. परंतु येथे पुन्हा एक नवीन आव्हान उभे ठाकले. सर्व नियमानुसार करूनही गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्चा प्रतिसाद फारच संथ होता. जेव्हा गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्च्या कार्यालयात फोन केला तर फक्त दोन आठवडे असे उत्तर मिळायचे. लोकमतकडून धर्मेंद्र हे गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस् कार्यालयाच्या नियमित संपर्कात होते. अखेर चार महिन्यानंतर म्हणजे ६ जानेवारी २०१५ रोजी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये सृष्टीचे नाव आल्याचे अधिकृत कळविण्यात आले. परंतु प्रमाणपत्र काही मिळाले नव्हते. त्यासाठी पुन्हा सातत्याने फोन, ई-मेल करावे लागले. शेवटी चार महिन्यांनी सृष्टीने केलेल्या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र हाती आले. या संपूर्ण प्रक्रियेत एक अख्खे वर्ष गेले.
लोकमत कन्येने मिळवून दिला सन्मान
By admin | Published: May 13, 2015 2:38 AM