लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लोकमत समूहाने अनेक समाजोपयोगी आणि अनेक प्रतिष्ठित स्पर्धांचे आयोजन करून शहरातील कलावंत व खेळाडूंना व्यासपीठ मिळवून दिले आहे. ११ फेब्रुवारी रोजी कस्तूरचंद पार्कवर नागपूर महामॅरेथॉनचे आयोजन करून नागरिकांत तंदुरुस्तीचा नवा संदेश देत असतानाच ऐतिहासिक शहरात सर्वधर्मसमभाव जपण्याचे उल्लेखनीय कार्य करीत आहे. रविवारी होणाऱ्या या आयोजनाबद्दल नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये विशेष ओढ असून किमान पाच किलोमीटर अंतर तरी धावायचेच, अशी मनोमन इच्छा प्रबळ झाली आहे,समाजात एकोपा निर्माण करणे यास असे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते, शिवाय फिटनेसविषयी प्रचंड जागरूकता निर्माण होते. लोकमत समूहदेखील महामॅरेथॉनचे आयोजन करून नागरिकांमध्ये तंदुरुस्तीचे महत्त्व रुजविण्यासाठी महत्त्वाचे योगदान देत आहे.शरीर सुदृढ राहावे हे कुणाला आवडणार नाही. आजच्या युवा पिढीत जीम संस्कृतीची क्रेझ पाहायला मिळते. त्याचवेळी जंक फूड खाणाऱ्यांची संख्या वाढत चालल्याने हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा विळखा घट्ट होत आहे. आजारग्रस्त होणाऱ्यांमध्ये बालकांपासून वयोवृद्धांचाही समावेश आढळतो. तथापि रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी धावण्यासारखा स्वस्त असा व्यायाम नाही. धावण्याचे फायदेही अनेक आहेत. हजारो लोक एकाचवेळी एकत्र येतात तेव्हा उत्साह सळसळतो. म्हणूनच मॅरेथॉन हा ‘उत्साहाचा उत्सव’ असेही संबोधल्यास वावगे ठरणार नाही.झोपप्रिय युवा पिढीला हलवून जागे करण्यासाठी वारंवार असे आयोजन व्हायलाच हवे. त्यामुळे आतापर्यंत धावले नसतील असे लोक इतरांकडून प्रोत्साहन घेत धावण्यास सज्ज होऊ शकतात. आळस झटकून मैदानावर येण्यास तत्पर होऊ शकतील. कुठल्याही वयात व्यायाम आणि धावण्याचा सराव सुरू केला तरी तो व्यर्थ जात नाही. पुढील आयुष्य सोपे आणि आनंदमय होते. लोकमतने जुळवून आणलेला ‘महामॅरेथॉन’रूपी योग ही संधी मानून धावायला लागा. वाढता... वाढता... वाढे, या म्हणीप्रमाणे धावण्याचे तंत्र अंगी येईल, या आशेने आजच सुरुवात करा. मी माझ्या आरोग्यासाठी धावतो, हे ब्रीद नेहमी लक्षात असू द्या. निरोगी वाटचालीसाठी हे आवश्यक आहे.
लोकमत महामॅरेथॉनमधून मिळतो सर्वांना सर्वधर्मसमभावाचा संदेश; राजाभाऊ टांकसाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 11:47 AM
११ फेब्रुवारी रोजी कस्तूरचंद पार्कवर नागपूर महामॅरेथॉनचे आयोजन करून नागरिकांत तंदुरुस्तीचा नवा संदेश देत असतानाच ऐतिहासिक शहरात सर्वधर्मसमभाव जपण्याचे उल्लेखनीय कार्य करीत आहे.
ठळक मुद्देमॅरेथॉन हा उत्सवांचा उत्सव