नागपूर : लोकमतचे प्रथम संपादक पद्मश्री पां. वा. गाडगीळ व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म.य. उपाख्य बाबा दळवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, अनुक्रमे आर्थिक-विकासात्मक लेखन पत्रकारिता आणि शोधपत्रकारिता या दोन श्रेणींसाठी लोकमततर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचे २०२१ व २०२२ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेत संबंधित वर्षभरात मराठी भाषेतील वृत्तपत्रे, नियतकालिके व मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेले लेख व बातम्यांना पुरस्कृत केले जाते.
२०२१ व २०२२ चे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत. (कंसात शीर्षक व वृत्तपत्राचे नाव). पां.वा. गाडगीळ आर्थिक-विकासात्मक लेखन स्पर्धा- वर्ष २०२१; प्रथम पुरस्कार-वंदना धर्माधिकारी, पुणे. (आत्मनिर्भर, साप्ताहिक अर्थशक्ती), द्वितीय पुरस्कार-विनोद धनाजी शेंडे, पुणे. (भूक निर्देशांक: घसरणीचा विकास, लोकसत्ता). तृतीय पुरस्कार- प्रवीण घोडेस्वार, (महिला स्वच्छता कामगारांची दयनीय अवस्था, मिळून साऱ्याजणी)
वर्ष २०२२; प्रथम पुरस्कार- सूर्यकांत पाठक, पुणे. (ग्राहक हक्कांना मिळणार बळकटी, ग्राहकहित). द्वितीय पुरस्कार- डॉ. प्रतिमा इंगोले, अमरावती. (शेतीचा शोध घेऊनही स्त्रीची आर्थिक कोंडी, पुण्यनगरी). तृतीय पुरस्कार- समीर मराठे, नाशिक. (ट्रक ड्रायव्हर्सच्या आयुष्यावरील लेख, ‘उस्ताद’, लोकमत). म.य. उपाख्य बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा- वर्ष २०२१; प्रथम पुरस्कार-डॉ. योगेश प्रकाश पांडे, नागपूर (नागपुरात ‘नीट’चा घोटाळा, लोकमत). द्वितीय पुरस्कार- विश्वास पाटील, कोल्हापूर. (दामदुप्पट परताव्याचा भुलभुलैय्या, लोकमत). तृतीय पुरस्कार-विवेक भुसे, पुणे. (राज्यभर गाजलेल्या स्पर्धा परीक्षा गैरव्यवहार, लोकमत).
वर्ष २०२२; प्रथम पुरस्कार-बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर. (शेकडो कोटींच्या अॉनलाईन घोटाळ्याचा भंडाफोड, लोकमत). द्वितीय पुरस्कार- इंदुमती सूर्यवंशी, कोल्हापूर. (जयप्रभा स्टुडिओची दोन वर्षांपूर्वीच विक्री, लोकमत). तृतीय पुरस्कार- सुमेध वाघमारे, नागपूर. (शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरचा अभाव, लोकमत)
या पुरस्कार स्पर्धेकरिता आर्थिक-विकासात्मक लेखन गटासाठी दोन्ही वर्षांसाठी आलेल्या एकूण १०३ प्रवेशिकांमधून ४७ प्रवेशिका स्पर्धेकरिता पात्र ठरल्या. शोधपत्रकारिता गटासाठी आलेल्या ८६ प्रवेशिकांमधून ३६ प्रवेशिका पात्र ठरल्या. दोन्ही गटांच्या पात्र प्रवेशिकांमधून तीन-तीन विजेत्यांची निवड करण्यात आली. पुरस्कारांचे स्वरुप, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. या स्पर्धांचे परीक्षण ज्येष्ठ संपादक कमलाकर धारप व दिलीप तिखिले यांनी केले आहे. या पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याबाबतची सूचना कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर विजेत्यांना दूरध्वनीद्वारे दिली जाईल.