शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञाचा आज प्रारंभ, दिग्गजांच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 7:48 AM

‘लोकमत’ भवन येथे ऊर्जामंत्री व पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते होईल, तर औरंगाबाद येथे सकाळी १० वाजता ‘लोकमत’ भवनात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते प्रारंभ होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर/औरंगाबाद : ‘लोकमत’च्यावतीने स्वातंत्र्यसंग्रामसेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर २ ते १५ जुलैदरम्यान ‘लोकमत-रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या महायज्ञाचा प्रारंभ शुक्रवारी नागपुरात सकाळी १०.३० वाजता स्व. जवाहरलाल दर्डा कला अकादमी, ‘लोकमत’ भवन येथे ऊर्जामंत्री व पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते होईल, तर औरंगाबाद येथे सकाळी १० वाजता ‘लोकमत’ भवनात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते प्रारंभ होणार आहे.

नागपुरात प्रमुख अतिथी म्हणून महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्मे, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, आ. प्रवीण दटके (विधान परिषद सदस्य), आ. कृष्णा खोपडे, आ. समीर मेघे, आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा,  नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार उपस्थित राहतील. औरंगाबादेत प्रारंभप्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.

टॅग्स :nagpurनागपूरAurangabadऔरंगाबादBlood Bankरक्तपेढी