शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

लोकमतचा दणका : मेडिकलच्या ‘त्या’ प्रसूतीप्रकरणी चार सदस्यीय चौकशी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 10:52 PM

मेडिकलच्या डॉक्टर व नर्सेसच्या असंवदेनशीलता व बेजबाबदार वृत्तीमुळे रविवारी पहाटे सुकेशनी श्रीकांत चतारे या महिलेला स्वत:च्या हाताने प्रसूती करावी लागली. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी एक चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली असून तीन दिवसात याप्रकरणी या समितीने अहवाल सादर करायचा आहे.

ठळक मुद्देतीन दिवसात अहवाल देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलच्या डॉक्टर व नर्सेसच्या असंवदेनशीलता व बेजबाबदार वृत्तीमुळे रविवारी पहाटे सुकेशनी श्रीकांत चतारे या महिलेला स्वत:च्या हाताने प्रसूती करावी लागली. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी एक चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली असून तीन दिवसात याप्रकरणी या समितीने अहवाल सादर करायचा आहे.नागपूरच्या मेडिकल कॉलेज येथे ही घटना घडली. ही गंभीर घटना लोकमतने उघडकीस आणली. या घटनेमुळे संपूर्ण नागपूररांचे मन हेलावून निघाले. या प्रकरणाची गंभीर दखल पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. सोमवारी मुंबईत पालकमंत्री बावनकुळे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांना या घटनेची माहिती दिली. आ.सुधाकर कोहळे व आ. परिणय फुके हे त्यांच्यासोबत होते. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे समाजात मेडिकलच्या डॉक्टर आणि नर्सेसबदल संतापाचे वातावरण निर्माण झाले असतानाच या घटनेची दखल घेणे आवश्यक झाले होते. पालकमंत्री बावनकुळे यांनी दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली. पालकमंत्री बावनकुळे यांच्या मागणीमुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, सर ज.जी.समूह रुग्णालयाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. अशोक आनंद, वैद्यकीय शिक्षणचे अवर सचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल या चार सदस्यांची समिती गठित केली असून या समितीला आपला चौकशी अहवाल तीन दिवसात द्यायचा आहे.हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी : बसपाने अधिष्ठात्यांना दिले निवेदनशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्त्री रोग व प्रसूती विभागात एका महिलेला स्वत:च्या हातानेच प्रसूती करण्याची वेळ आल्याच्या घटनेचा निषेध करीत दोषींवर कारवाई करण्याचा मागणीचे निवेदन बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) दक्षिण-पश्चिमच्यावतीने अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना देण्यात आले.‘लोकमत’ने ‘तिला स्वत:च्या हातानेच करावी लागली प्रसूती’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून प्रसूती विभागातील भोंगळ कारभार पुढे आणला. याची दखल पालकमंत्र्यांपासून ते वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली. बसपाचे दक्षिण-पश्चिम क्षेत्राचे संयोजक चंद्रशेखर कांबळे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ सोमवारी अधिष्ठाता डॉ. मित्रा यांना भेटले. गरीब रुग्णांच्या जिवाशी चालणारा खेळ बंद करण्याची व सुकेशनी चतारे या महिलेच्या प्रसूतीच्यावेळी ज्या डॉक्टर, नर्सेस, कर्मचाºयांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. शिष्टमंडळात रोहित पानतावने, स्वप्निल कांबळे, बलवीर नंदागवळी, आशा गायकवाड, किरण घडे, वैशाली कांबळे, अभिजीत नंदागवळी, बालचंद जगताप, अनिल चहांदे, सुनील पाटिल, सीमा चरपे, प्रबोधन मेश्राम, लक्ष्मी जगताप आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय