आॅनलाईन फ्रेण्डशिप महागात पडलीनागपूर : आॅनलाईन फ्रेण्डशिपनंतर एका तरुणीला तिच्या मित्राने १ लाख, २५ हजारांचा गंडा घातला. डॉ. रेमंड ओसवाल नामक हा कथित मित्र लंडनमध्ये राहतो, असे गंडविल्या गेलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पीडित तरुणी (वय २८) कोतवालीतील नंदाजीनगरात राहते. शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर तिची काही दिवसांपूर्वी डॉ. रेमंडशी ओळख झाली. आपण लंडनमध्ये राहतो, असे त्याने पीडित तरुणीला सांगितले. आॅनलाईन गप्पा वाढल्यानंतर त्याने तिला ‘तुझ्यासाठी सोन्याचा नेकलेस, लॅपटॉप आणि महागडा मोबाईल ‘गिफ्ट’ म्हणून पाठवत असल्याची खूशखबर दिली. हे पार्सल सोडविण्यासाठी ४ ते २५ मे दरम्यान तिला वेगवेगळ्या बँक खात्यात १ लाख, २५ हजार, ५०० रुपये भरण्यास सांगितले. रक्कम भरल्यानंतरही पार्सल मिळण्याचे नाव नव्हते. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नावाखाली रक्कम भरण्यास सांगितले जात असल्याने पीडित तरुणीला संशय आला. तिने कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)
लंडनच्या पार्सलपोटी सव्वालाख गमावले
By admin | Published: June 03, 2016 2:57 AM