लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडल्यामुळे आणि रेल्वेमार्गाच्या देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. यामुळे रविवारी नागपूर मार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना विलंब होऊन प्रवाशांची गैरसोय झाली. दरम्यान उशिराने येणाºया रेल्वेगाड्यात १२६२२ तामिळनाडु एक्स्प्रेस ५.३० तास, १३४२५ मालदा टाऊन-सुरत एक्स्प्रेस २ तास, १२१३० आझादहिंद एक्स्प्रेस १.४५ तास, १२९०६ हावडा-पोरबंदर एक्स्प्रेस १.३० तास, १२७२२ दक्षिण एक्स्प्रेस ४.३० तास, १२१५२ समरसता एक्स्प्रेस ४.३० तास, १२८३४ हावडा एक्स्प्रेस ३.३० तास आणि १२६५० संपर्कक्रांती एक्स्प्रेस १.३० तास या गाड्यांचा समावेश होता. उशिराने येणाºया रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसून राहण्याची पाळी आली. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रुम फुल्ल झाल्या होत्या.
ब्लॉक व धुक्यामुळे लांब पल्ल्याच्या आठ रेल्वेगाड्या ‘लेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 11:35 AM
उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडल्यामुळे आणि रेल्वेमार्गाच्या देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.
ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय