शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

आपली बस चेकर्सवर नजर ! तोटा कमी करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 9:10 PM

आपली बसचा तोटा कमी करण्यासाठी तिकिटांचा गैरव्यवहार रोखणे आवश्यक आहे. यासाठी चेकर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे.परंतु चेकर्सलाही धमक्या येतात. याचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने चेकर्सवर नजर ठेवली जाणार आहे.

ठळक मुद्देपरिवहन समिती सभापतींचा चेकर्ससोबत संवाद

लोकमत न्यूच नेटवर्कनागपूर : आपली बसचा तोटा कमी करण्यासाठी तिकिटांचा गैरव्यवहार रोखणे आवश्यक आहे. यासाठी चेकर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु चेकर्सलाही धमक्या येतात. यामुळे तिकीट तपासनीच्या कामात बाधा येते. तसेच अनेकदा हस्तक्षेप केला जातो. याचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने चेकर्सवर नजर ठेवली जाणार आहे. यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे.शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी परिवहन सेवा चालविली जाते. यासाठी दर महिन्याला जवळपास सात कोटीचा तोटा होतो. हा तोटा कमी करण्यासाठी तिकिटांचा गैरप्रकार रोखला जावा, यात कंपनीतर्फे नेमण्यात येणाऱ्या चेकर्सची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे चेकर्सवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या १५ कर्मचाऱ्यांवर दिली जाणार असल्याची माहिती परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी शनिवारी दिली.आपली बस सेवेसाठी नियुक्त डिम्स कंपनीच्या ७० चेकर्ससोबत बोरकर यांनी स्वतंत्र बैठक घेऊ न संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी समिती सदस्या अर्चना पाठक, मनिषा धावडे, वैशाली रोहणकर, सदस्य नागेश मानकर, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, लेखा अधिकारी विनय भारद्वाज, डिम्सचे सूर्यकांत अंबाडेकर, सतीश सदावर्ते आदी उपस्थित होते.अकस्मात तपासणीत दोषी आढळणाऱ्या चेकर्सना थेट निलंबित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अनेकदा बसमधील तिकीट तपासणीसाठी चेकर्सनी बस थांबविल्यानंतर त्यांच्यावर तिकीट न तपासण्यासाठी दबाव आणला जातो. दबाव येत असल्यास थेट संपर्क साधा, संबंधितावर त्वरित कारवाई करण्यात येईल, असे बोरकर यांनी सांगितले.खासगी वाहतूक बंद कराडिम्स कंपनीला नियमितपणे देयक देण्यात येते. त्यामुळे मनपाचे उत्पन्न वाढविण्याचे दायित्व व नैतिक जबाबदारी ही कंपनी व चेकर्सचे आहे. बस कर्मचाऱ्यांकडूक सुरु असलेले अवैध वॉटस् अ‍ॅप ग्रुप तातडीने बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत. कुठल्याही प्रकारची धमकी अथवा महिला चेकर्स यांना त्रास झाल्यास ते सभापतींशी थेट संपर्क करतील, असे आवाहन केले. खासगी बसमार्फत होणारी शहरातील प्रवासी वाहतूक बंद करण्याचे निर्देश बोरकर यांनी दिले.अनेक बसेस नादुरस्तआपली बसच्या धंतोली येथील आगारात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. ती तातडीने वाढविण्याचे निर्देश त्यांनी डिम्सच्या अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय अनेक बसची अवस्था वाईट आहे. काही बसच्या सिट तुटलेल्या, खिडक्यांची काच फुटलेली, दरवाजे तुटलेल्या स्थितीत आहेत. बस तातडीने दुरुस्त करण्याबाबत कारवाई करा, तसेच तिकीट तपासणीवेळी बसची स्थिती व्यवस्थित न आढळल्यास संबंधित चेकर्सनी लगेच त्याचा फोटो कंपनीकडे पाठवावा,धूर सोडणाऱ्या बस आढळल्यास त्या बसचाही फोटो व क्रमांक कंपनीकडे पाठवा, याची दखल न घेतल्यास कारवाईचा इशारा बोरकर यांनी दिला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक