शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

मुंबई, पुण्याच्या पलीकडे बघा, विदर्भाकडे दुर्लक्ष करणे थांबवा; अनिल देशमुखांची BCCIला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 12:56 PM

हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या दहा स्थळांवर सामने होतील.

भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने  शंभर दिवस शिल्लक असताना मंगळवारी जाहीर केले. ५ ऑक्टोबर रोजी स्पर्धा सुरू होणार आहे. 

सलामीचा सामना अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.

हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या दहा स्थळांवर सामने होतील. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात भारतीय संघाचा एक-एक सामना होणार आहे. तसेच पहिला उपांत्यफेरीचा सामना देखील मुंबईत होणार आहे. यासोबतच मुंबई आणि पुण्यात इतर संघाचे काही सामने देखील होणार आहे. 

महाराष्ट्रात अनेक क्रिकेट स्टेडियम आहेत. नागपूरमध्ये देखील प्रसिद्ध असं विदर्भ क्रिकेट असोशियन स्टेडियम आहे. मात्र नागपूरमध्ये विश्वचषक स्पर्धेचे सामने होणार नाही. याचपार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी नाराजी वर्तवली आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या सामन्यांच्या आयोजनासाठी नागपूरकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अत्यंत निराशा झाली. यात जागतिक दर्जाच्या स्टेडियमपासून शहराच्या पायाभूत सुविधांपर्यंत सर्व सुविधा आहेत. प्रशासनाने मुंबई आणि पुण्याच्या पलीकडे बघून विदर्भाकडे दुर्लक्ष करणे थांबवावे. मी बीसीसीआयला काही सामन्यांसाठी नागपूरचा विचार करण्याची विनंती करतोय, असं अनिल देशमुख ट्विटरद्वारे म्हणाले.

पुण्यात होणार स्पर्धेतील पाच सामने

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात गर्दी करणाऱ्या पुण्यातील क्रिकेट प्रेमींसाठी आनंदवार्ता आहे. २७ वर्षांनंतर पुण्यात विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे तब्बल पाच सामने रंगणार आहेत. 

वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक

५ ऑक्टोबर    इंग्लंड वि. न्यूझीलंड    अहमदाबाद६ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. क्वालिफायर १    हैदराबाद७ ऑक्टोबर    बांगलादेश वि. अफगाणिस्तान    धर्मशाला७ ऑक्टोबर    द. आफ्रिका वि. क्वालिफायर २    दिल्ली८ ऑक्टोबर    भारत वि. ऑस्ट्रेलिया    चेन्नई९ ऑक्टोबर    न्यूझीलंड वि. क्वालिफायर १    हैदराबाद१० ऑक्टोबर    इंग्लंड वि. बांगलादेश    धर्मशाला११ ऑक्टोबर    भारत वि. अफगाणिस्तान    दिल्ली१२ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. क्वालिफायर २    हैदराबाद१३ ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका    लखनौ१४ ऑक्टोबर    इंग्लंड वि. अफगाणिस्तान    दिल्ली१४ ऑक्टोबर    न्यूझीलंड वि. बांगलादेश    चेन्नई१५ ऑक्टोबर    भारत वि. पाकिस्तान    अहमदाबाद१६ ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर २    लखनौ१७ ऑक्टोबर    द. आफ्रिका वि. क्वालिफायर १    धर्मशाला१८ ऑक्टोबर    न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान    चेन्नई१९ ऑक्टोबर    भारत वि. बांगलादेश    पुणे२० ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान    बंगळुरू२१ ऑक्टोबर    इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका    मुंबई२१ ऑक्टोबर    क्वालिफायर १ वि. क्वालिफायर २    लखनौ२२ ऑक्टोबर    भारत वि. न्यूझीलंड    धर्मशाला२३ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. अफगाणिस्तान    चेन्नई२४ ऑक्टोबर    दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश    मुंबई२५ ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर १    दिल्ली२६ ऑक्टोबर    इंग्लंड वि. क्वालिफायर २    बंगळुरू२७ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका    चेन्नई२८ ऑक्टोबर    क्वालिफायर १ वि. बांगलादेश    कोलकाता२८ ऑक्टोबर    ऑस्ट्रेलिया वि. न्यूझिलंड    धर्मशाला२९ ऑक्टोबर    भारत वि. इंग्लंड    लखनौ३० ऑक्टोबर    अफगाणिस्तान वि. क्वालिफायर २    पुणे३१ ऑक्टोबर    पाकिस्तान वि. बांगलादेश    कोलकाता१ नोव्हेंबर    न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका    पुणे२ नोव्हेंबर    भारत वि. क्वालिफायर २    मुंबई३ नोव्हेंबर    क्वालिफायर १ वि. अफगाणिस्तान    लखनौ४ नोव्हेंबर    इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया    अहमदाबाद४ नोव्हेंबर    न्यूझीलंड वि. पाकिस्तान    बंगळुरू५ नोव्हेंबर    भारत वि. दक्षिण आफ्रिका    कोलकाता६ नोव्हेंबर    बांगलादेश वि. क्वालिफायर २    दिल्ली७ नोव्हेंबर    ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान    मुंबई८ नोव्हेंबर    इंग्लंड वि. क्वालिफायर १    पुणे९ नोव्हेंबर    न्यूझीलंड वि. क्वालिफायर २    बंगळुरू१० नोव्हेंबर    द. आफ्रिका वि. अफगाणिस्तान    अहमदाबाद११ नोव्हेंबर    भारत वि. क्वालिफायर १    बंगळुरू१२ नोव्हेंबर    इंग्लंड वि. पाकिस्तान    कोलकाता१२ नोव्हेंबर    ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश    पुणे१५ नोव्हेंबर    पहिला उपांत्य सामना    मुंबई१६ नोव्हेंबर    दुसरा उपांत्य सामना    कोलकाता१७ नोव्हेंबर     राखीव दिवस    —————१९ नोव्हेंबर    फायनल     अहमदाबाद    २० नोव्हेंबर     राखीव दिवस    ——————

टॅग्स :ICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कपBCCIबीसीसीआयnagpurनागपूरAnil Deshmukhअनिल देशमुख