लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १० हजार रुपये उधार देण्यास नकार दिल्यामुळे तीन आरोपींनी एका तरुणाला मारहाण करून १८ हजार रुपये तसेच दोन मोबाईल हिसकावून नेले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर, सावता लॉनजवळ ८ जुलैच्या रात्री ही घटना घडली.अनुप हंसराज मिश्रा (वय २८) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. तो वर्धा मार्गावरील चिंचभुवन परिसरात राहतो. आरोपी हर्षल पोहनकर (वय २१) मुळचा वरूड जि. अमरावती येथील रहिवासी आहे. तो सध्या मानेवाड्यात राहतो. त्याचा साथीदार आरोपी दिनेश वंजारी (वय २१) रघुजीनगर सोमवारी क्वॉर्टर परिसरात राहतो. तर एक साथीदार अज्ञात आहे. या तिघांपैकी आरोपी हर्षलने अनुपला १० हजार रुपये उधार मागितले होते. बदल्यात स्वत:ची गाडी अनुपकडे ठेवण्याची तयारी दाखवली होती. अनुपने नकार दिल्याने आरोपी चिडले. या पार्श्वभूमीवर, रविवारी रात्री आरोपींनी अनुपला सावता लॉनजवळ बोलवले. हर्षलकडे पुन्हा पैशाचा विषय काढला. अनुपने उधार देण्यास नकार दिल्याने आरोपी हर्षल तसेच त्याच्या साथीदारांनी अनुपला मारहाण केली. त्याच्याजवळून १८ हजार रुपये तसेच दोन मोबाईल हिसकावून घेतले. अनुपने बुधवारी रात्री या प्रकरणाची तक्रार हुडकेश्वर ठाण्यात नोंदवली. एपीआय मोले यांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला.आरोपींचा शोध घेतला जात आहे.---संशयास्पद बाबीहे प्रकरण पोलिसांना संशयास्पद वाटते. ८ जुलैच्या रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार तीन दिवसांनंतर अनुपने पोलिसांकडे नोंदवली. या प्रकरणात आरोपींनी एका तरुणीची छेड काढण्याचा मुद्दाही उपस्थित केला होता, असे तो सांगतो. त्याने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आरोपी हर्षलसोबत त्याचे यापूर्वीही रक्कम देण्याघेण्याचे व्यवहार झाले आहे. घटनेच्या वेळी हर्षल आणि त्याच्या साथीदारांनी त्याला तुझ्याकडे शस्त्र असल्याचा आम्हाला संशय आहे, असे म्हणून त्याच्या तोंडावर दुपट्टा टाकून त्याचे खिसे तपासण्याच्या बहाण्याने रक्कम काढून घेतली. या सर्व बाबींचा खुलासा आरोपी सापडल्यानंतर होईल, असे हुडकेश्वर पोलीस सांगतात.
रक्कम उधार दिली नाही म्हणून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 10:46 PM
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १० हजार रुपये उधार देण्यास नकार दिल्यामुळे तीन आरोपींनी एका तरुणाला मारहाण करून १८ हजार रुपये तसेच दोन मोबाईल हिसकावून नेले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर, सावता लॉनजवळ ८ जुलैच्या रात्री ही घटना घडली.अनुप हंसराज मिश्रा (वय २८) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. तो वर्धा मार्गावरील ...
ठळक मुद्देनागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल