शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

गटबाजीने हरले; कार्यकर्त्यांनी तारले

By admin | Published: February 26, 2017 2:11 AM

विकास कामाचे डबे घेऊन निघालेल्या भाजपाच्या ‘प्रगती एक्स्प्रेस’ ने नागपुरात १०८ जागांचा पल्ला गाठला.

९५ जागी काँग्रेस दुसऱ्या नंबरवर अपयशाची शाई पुसणार कोण ? पक्षश्रेष्ठी घेणार का दखल ? जितेंद्र ढवळे   नागपूर विकास कामाचे डबे घेऊन निघालेल्या भाजपाच्या ‘प्रगती एक्स्प्रेस’ ने नागपुरात १०८ जागांचा पल्ला गाठला. त्यामुळे २९ जागा जिंकणाऱ्या आणि ९५ वॉर्डात (जागावर) दुसरा नंबर मिळविणाऱ्या काँग्रेसमध्ये गटबाजीची शाई कधी पुसली जाईल, असा सवाल सामान्य कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. नागपूर महापालिकेत यावेळी किमान ६० जागांचा टप्पा गाठू, असा एक्झिट पोल काँग्रेसमधील सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे वर्तविला होता. मात्र जसजसा निवडणुकीचा पारा वाढत गेला, तसतशी गटबाजीची शाई अधिक घट्ट होत गेली आणि ती थेट पक्षाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या चेहऱ्यावर पोहोचली. त्यामुळे आता कॉँग्रेसमध्ये आॅपरेशन क्लीन हवे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तिकीट कापाकापीच्या पतंगबाजीत कॉँग्रेस नेते व्यस्त असले तर शहरात काँग्रेसने किमान ६० जागांचा टप्पा गाठावा, यासाठी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता सतत लढत होता. महापालिका निकालाची आकडेवारीही तसे दर्शविते. यंदा पहिल्यांदाच काँग्रेसने मनपा निवडणूक कार्यकर्त्यांच्या बळावर लढली. चव्हाण यांची एक प्रचारसभा वगळता एकही मोठा नेता शहरात उमेदवाराच्या प्रचारासाठी आला नाही. नेते आले नाही म्हणून २९ नगरसेवक निवडून आले आणि बसपालाही दिली टक्कर उपराजधानीत मतविभाजनाचा फटका नेहमी काँग्रेसला बसत आला आहे. यावेळी ज्या प्रभागात बसपाचे उमेदवार निवडून आले आहेत तिथेही कॉँग्रेस दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये बसपाचे चारही उमेदवार निवडून आले. येथे प्रभाग क्रमांक ६(अ) आणि ६ (ब) मध्ये काँग्रेस दुसऱ्या तर ६ (क) आणि ६(ड) मध्ये तिसऱ्या क्रमाकांवरक राहिली आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्ये बसपाचे तीन तर कॉँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला आहे. येथेही ७(अ) आणि ७ (ब) मध्ये काँग्रेस दुसऱ्या ७(क) मध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. हीच स्थिती प्रभाग क्रमांक ९ मध्येही कायम दिसते. येथे बसपाचे तीन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला आहे. येथेही प्रभाग क्रमांक ९(ब), ९(क) आणि ९(ड) मध्ये काँग्रेसची दुसऱ्या क्रमांकावरील स्थिती कायम आहे. त्यामुळे मतांचा हा ट्रेंड लक्षात घेता काँग्रेसला ‘ग्लुकोज’ची नाही तर ग्लुकोव्हिटाची गरज असल्याची मागणी सामान्य कार्यकर्त्यांकडून होत आहे.