शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

घर एक सर्वेक्षण अनेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:53 AM

शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने मे. सायबरटेक सिस्टम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीसोबत २०१५ मध्ये करार केला होता.

ठळक मुद्देसायबरटेकवर मनपाची कृपादृष्टीयुनिटची संख्या वाढविण्यासाठी नवी शक्कल; मनपाच्या तिजोरीवर गंडा

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने मे. सायबरटेक सिस्टम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीसोबत २०१५ मध्ये करार केला होता. यात प्रति युनिट(एक घर)साठी १२० रुपये दर निश्चित करण्यात आला होता. मालमत्ता कर आकारण्यात येणारी इमारत म्हणजे एक युनिट गृहित धरण्यात आले होते. परंतु एकाच इमारतीत अधिक कुटुंब वा भाडेकरू वास्तव्यास असल्याचे दर्शवून शहरातील युनिट फु गविले जात आहे. यामुळे सर्वेक्षण करणाºया कंपनीला कोट्यवधींची रक्कम अधिक मिळणार आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे.करारानुसार सायबरटेक कंपनीला शहरातील मालमत्ता सर्वेक्षण व पुनर्मूल्यांकन करावयाचे आहे. यासाठी ७ कोटी २० लाख खर्च अपेक्षित आहे तसेच मालमत्तांच्या डाटा एन्ट्रीचे काम करावयाचे आहे. यावर ६ कोटी ७५ लाखांचा खर्च केला जाणार आहे. सुरुवातीच्या करारानुसार एका इमारतीचे सर्वेक्षण म्हणजे एक युनिट असे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार गेल्या दोन वर्षापासून शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण व पुनर्मूल्यांकनाचे काम सुरू आहे. याबाबतचे बिलही कंपनीला देण्यात आले आहे. करारात युनिटसंदर्भात स्पष्ट उल्लेख असतानाही ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा साक्षात्कार सायबरटेक व मालमत्ता विभागाला झाला आहे. एका इमारतीत वेगवेगळे कुटुंब वास्तव्यास असल्यास सर्वेक्षणात प्रत्येक कुटुंबाचे स्वतंत्र युनिट गृहित धरण्यात यावे. तसेच भाडेकरू वास्तव्यास असल्याचे त्याचे स्वतंत्र युनिट गृहित धरण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दोन ते तीन कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे. वास्तविक मालमत्ता कर आकारणीनुसार युनिट संख्या मोजायला हवी. एका इमारतीला एकच देयक पाठविले जात असेल तर एक युनिट होते. परंतु भाडेकरू वा दोन भाऊ वेगवेगळे वास्तव्यास दर्शवून एकाच इमारतीचे अनेक युनिट दर्शवून महापालिकेला गंडा घालण्याचा प्रकार सुरू आहे.कमी करासाठी पैशाची मागणीसर्वेक्षण करताना कमी कर आकारण्यासाठी पैशाची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. कर निर्धारक बांधकाम क्षेत्रफळ कमी दर्शवून कमी कर लावण्याचा सल्ला देत आहेत. वाठोडा परिसरात हा प्रकार निदर्शनास आला. येथील एका कुटुंबीयांकडे हा प्रकार घडला. शहराच्या इतर भागातही असाच प्रकार सुरू असल्याने सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आकारावयाचा होता दंड, केली खैरातवास्तविक करारानुसार सायबरटेक कंपनीने सप्टेंबर २०१७ पर्यंत शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण व पुनर्मूल्यांक न करावयाचे होते. परंतु सर्वेक्षणाचे काम संथ असल्याने अद्याप शहरातील अर्ध्या घरांचे सर्वेक्षण झालेले नाही. निर्धारित कालावधीत सर्वेक्षण झाले असते तर मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले असते. निर्धारित कालावधीत सर्वेक्षण न केल्याने कंपनीला दंड आकारणे अपेक्षित असताना युनिटची संख्या वाढवून कंपनीवर पैशाची खैरात केली आहे.करारात प्रिंटिंग चूक कशीमहापालिका व सायबरटेक यांचा करारनामा प्रिंट करताना त्यात प्रिंटिंग चूक झाल्याचा साक्षात्कार दोन वर्षानंतर झाला आहे. त्यामुळे सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. युनिटची व्याख्या बदलवायची होती तर याबाबतचा प्रस्ताव सभागृहात चर्चेसाठी का ठेवण्यात आला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.