शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

एम. टेक. प्रवेशाकरिता अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र बंधनकारक : उच्च न्यायालयाचा आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 11:07 PM

For M. Tech. Scheduled Tribe Validity Certificate Mandatory एम. टेक., एम. आर्क. व एम. प्लॅन. या अभ्यासक्रमांमध्ये अनुसूचित जमातीकरिता राखिव जागांवर प्रवेश देण्यासाठी केवळ वैधता प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांचेच अर्ज स्वीकारण्यात यावेत असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी सेंट्रलाईज्ड कौन्सिलिंगला दिला.

ठळक मुद्देएम. आर्क. व एम. प्लॅन.चाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : एम. टेक., एम. आर्क. व एम. प्लॅन. या अभ्यासक्रमांमध्ये अनुसूचित जमातीकरिता राखिव जागांवर प्रवेश देण्यासाठी केवळ वैधता प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांचेच अर्ज स्वीकारण्यात यावेत असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी सेंट्रलाईज्ड कौन्सिलिंगला दिला. तसेच, सेंट्रलाईज्ड कौन्सिलिंगसह केंद्र सरकार व राज्य सरकारला नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात ट्रायबल ऑफिसर्स फोरमने याचिका दाखल केली आहे. सदर अंतरिम आदेश केवळ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात आला आहे. या आदेशानुसार स्वीकारलेल्या अर्जांवर कायद्यानुसार पुढील प्रक्रिया करा असेही न्यायालयाने सांगितले आहे. २०२० पर्यंत सदर अभ्यासक्रमांतील राखिव जागांवर प्रवेश देण्यासाठी केवळ जात वैधता प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांचेच अर्ज स्वीकारले जात होते. त्यामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या जागांवर खऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. बोगस आदिवासी प्रवेश घेऊ शकले नाही. परंतु, २०२१ मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट वगळण्यात आली. त्यांना केवळ जात प्रमाणपत्राच्या आधारावर प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे बोगस आदिवासी विद्यार्थ्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या जागांवर प्रवेश मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. करिता, विवादित निर्णय अवैध ठरवून रद्द करण्यात यावा असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

जात प्रमाणपत्र अवैध

जात प्रमाणपत्र कायद्यातील कलम ४(२) अनुसार जात प्रमाणपत्र हे पडताळणी समितीकडून वैध हाेतपर्यंत अवैध असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ जात प्रमाणपत्राच्या आधारावर राखिव जागांवर प्रवेश दिला जाऊ शकत नाही असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. मोहन सुदामे व ॲड. अक्षय सुदामे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCaste certificateजात प्रमाणपत्र