लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वीजदरात सवलत मिळण्यासाठी यंत्रमाग घटकांनी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक उपायुक्त स.ल. भोसले यांनी दिली आहे. वस्त्रोद्योग धोरणांतर्गंत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन नोंदणी केली नसल्यामुळे २७ अश्वशक्तीपेक्षा कमी व त्यापेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना हे अर्ज करता येणार आहेत. या कालावधीत संबंधित यंत्रमाग चालकांनी ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज न केल्यास त्यांची नोंदणी करेपर्यंत ही वीजदर सवलत बंद करण्यात येईल, असेदेखील त्यांनी सांगितले आहे.