नागपूर : डॉ. माधुरी सुतोणे-चौधरी यांची विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी (व्हीएनआयटी) नागपूरच्या अधिष्ठाता (संशोधन व सल्लागार) पदावर निवड झाली आहे. व्हीएनआयटीच्या इतिहासात या पदावर त्यांच्या रुपाने पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली आहे. व्हीएनआयटीच्या व्यवस्थापनात संचालकानंतर पाच अधिष्ठाता कार्य करीत असतात. डॉ. माधुरी या मूळच्या यवतमाळच्या असून जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध टेलरींग व्यवसायी नारायण सुतोणे यांच्या कन्या आहेत. त्यांनी राणी लक्ष्मीबाई विद्यालय व अमोलकचंद महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. त्यांच्या नियुक्तीने राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्या नुकत्याच ४ जानेवारी रोजी इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग विभागाच्या विभागप्रमुख म्हणून कार्यमुक्त झाल्या. त्यांच्या मार्गदर्शनात अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट म्हणून पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विषयावरील अनेक संशोधन पेपर राष्ट्रीय स्तरावर सादर केले आहेत.
माधुरी सुतोणे व्हीएनआयटीच्या अधिष्ठाता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:15 AM