लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आरोपीला बजाजनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. करण सुरेश इवनाते (वय २३) असे त्याचे नाव असून, तो पांढुरणा (जि. छिंदवाडा) येथील रहिवासी आहे.हिंगणा टी-पॉईंटवरील हॉटेल फ्यूल हेडक्वॉर्टरमध्ये करण कूक म्हणून काम करतो. तो बजाजनगरातील हॉटेलसमोर पिस्तूल विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती बजाजनगरचे ठाणेदार राघवेंद्र क्षीरसागर यांना दुपारी मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे धाव घेतली. संशयास्पद अवस्थेत उभा असलेल्या करणने पोलिसांना बघताच पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कंबरेत पोलिसांना पिस्तूल (कट्टा) मिळाले. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. चौकशीत करणने हा कट्टा भोपाळमधून १५ हजारात आणला. तो येथे विकण्यासाठी ग्राहक शोधत होता, असे सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचा गुन्हेगारी अहवाल तपासला जात आहे.
मध्य प्रदेशातील तरुणास पिस्तुलासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 8:32 PM
पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आरोपीला बजाजनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
ठळक मुद्देनागपूरच्या बजाजनगर पोलिसांची कारवाई