लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : पाेलिसांनी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गाेंडखैरी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये माेहफुलाची अवैध वाहतूक करणारी कार पकडली. यातील आराेपी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले. यात पाेलिसांनी एकूण २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. १९) रात्री करण्यात आली.
कळमेश्वर पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना गाेंडखैरी शिवारातून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या या पथकाने गाेंडखैरी शिवारातील हिंगणा टी पाॅईंट येथून जाणाऱ्या वाहनांवर नजर ठेवली हाेती. मात्र, पाेलीस पुढे असल्याचे लक्षात येताच कारचालकाने (एमएच-४९/एफ-१२७८) कार मध्येच उभी केली आणि कार साेडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. ही बाब लक्षात येताच पाेलिसांनी त्या कारची झडती घेतली. त्या कारमध्ये त्यांना माेहफुलाची ४०० लिटर दारू आढळून आली.
ती दारूची अवैध वाहतूक असल्याने पाेलिसांनी कारसह दारू जप्त केली. या कारवाईमध्ये १ ५० हजार रुपये किमतीची कार आणि ८० हजार रुपयांची ४०० लिटर माेहफुलांची दारू, असा एकूण २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार आसिफराजा शेख यांनी दिली असून, आरेापीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक फाैजदार दिलीप सपाटे करीत आहेत.