लाेकमत न्यूज नेटवर्क
पवनी (रामटेक) : देवलापार पाेलीस पथकाने चाेरबाहुली शिवारातील तलावकाठावर सुरू असलेल्या माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकून ती उद्ध्वस्त केली. यात माेहफुलाच्या दारूसह ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईदरम्यान आराेपी पसार झाला. ही कारवाई मंगळवारी (दि. ४) करण्यात आली.
लाॅकडाऊन व संचारबंदीमुळे सर्वत्र दारूची दुकाने बंद असल्याने ग्रामीण भागात माेहफुलाच्या दारूची माेठ्या प्रमाणात विक्री हाेत आहे. दरम्यान, देवलापार पाेलीस पथक गस्तीवर असताना चाेरबाहुली शिवारातील तलावकाठावर माेहफुलाची दारूभट्टी सुरू असल्याची गुप्त सूचना पाेलिसांना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी सदर दारूभट्टीवर धाड टाकली. पाेलिसांना पाहून आराेपी जगदीश वानखेडे तेथून पसार झाला. पाेलिसांनी दारूभट्टी उद्ध्वस्त करीत तेथील ४०० किलाे माेहफूल रसायन सडवा, ५० लिटर माेहफुलाची दारू व दारू काढण्याचे इतर साहित्य असा एकूण ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (ई),(फ) अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांच्या नेतृत्वात पाेलीस उपनिरीक्षक लक्ष्मी घाेडके, नाईक पाेलीस संदीप नागाेसे, संताेष वाट, अमाेल चिकने यांच्या पथकाने केली.