लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : खापरखेडा (ता. सावनेर) व परिसरातील माेठ्या गावांमध्ये हल्ली माेकाट गुरांची संख्या वाढली आहे. ही जनावरे राेडच्या मध्यभागी बसत असून, राेडवर फिरत असल्याने रहदारीस अडसर निर्माण करतात. काही गुरे आक्रमक असल्याने ती मारायला धावतात. त्यामुळे नागरिकांची डाेकेदुखी वाढली असून, गुरांचे मालक मात्र निश्चिंत आहेत.
ही माेकाट जनावरे कळपाने गावातील प्रत्येक राेडने व माेहल्ल्यात मुक्त संचार करतात. काही जनावरे बराच वेळ राेडवर बसून असतात. ते हाकलूनही जात नाहीत. काही जनावरांची राेडवरच टक्कर हाेते. या टकरीतील जनावरे नागरिकांच्या अंगावर किंवा वाहनांवर येत असल्याने अपघातही हाेत आहेत. मध्यंतरी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने माेकाट गुरांना पकडून काेंडवाड्यात टाकण्याची तसेच गुरांच्या मालकांचा शाेध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम हाती घेतली हाेती. परंतु, तरीही गुरांचे मालक वठणीवर आले नाहीत.
दुसरीकडे, या माेकाट गुरांचा वावर व उपद्रव वाढल्याने ही समस्या साेडविण्यासाठी पशू निवारण केंद्र सुरू करण्याची मागणीही काही नागरिकांनी केली आहे. परंतु, यासाठी लागणारा खर्च व मनुष्यबळाची व्यवस्था करणार काेण, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. ही गुरे काहीही खात असल्याने त्यांना विषबाधा हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या माेकाट गुरांची कुठेही नाेंद नसल्याने त्यांच्या मालकांचा शाेध घेणे ग्रामपंचायत प्रशासनासाठी अशक्यप्राय ठरते.
ही जनावरे अपघातांना कारणीभूत ठरत असून, त्यात गुरांसह वाहनचालक जखमी हाेत असल्याने या माेकाट गुरांचा तातडीने बंदाेबस्त करावा तसेच त्यांच्या मालकांवर ग्रामपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी खापरखेडा येथील नागरिकांनी केली आहे.
...
प्लास्टिक पिशव्यांमुळे आराेग्य धाेक्यात
या गुरांना खायला चांगला चारा मिळत नाही. त्यामुळे ते राेडलगत पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, नागरिकांनी फेकलेले शिळे अन्न व खाद्यपदार्थ तसेच मिळेल ते खाऊन पाेट भरतात. त्यांच्या पाेटात प्लास्टिकच्या पिशव्यांचे विघटन हाेत नाही. तसेच शिजविलेले अन्न अथवा खाद्यपदार्थ गुरांच्या आराेग्याच्या दृष्टीने हानीकारक असते. त्यामुळे या माेकाट गुरांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.
...
थंडीमुळे वासराचे हाल
खापरखेडा येथील बाेरकर ले-आऊटमध्ये असलेल्या महल्ले किराणा दुकानाच्या परिसरात काही दिवसापासून एक गाय तिच्या नुकत्याच जन्मलेल्या वासरासह फिरत आहे. थंडीमुळे त्या वासराचे हाल हाेत असून, गाईचा मालक त्या गाईसह वासराला न्यायला तयार नाही. काही मालक गाई जाेवर दूध देतात, ताेवर त्यांना घरी ठेवतात. दूध संपल्यावर त्यांना माेकाट साेडून देतात.
...