लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मग्रारोहयो अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर गत सहा ते सात वर्षांपासून कंत्राटी नियुक्तीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना व ग्रामरोजगार सेवकांना तीन महिन्यांपासून कुठलेही मानधन मिळाले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाºयांच्या मानधनाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी या कर्मचाºयांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.कर्मचाºयांच्या या समस्येबाबत त्यांच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ कार्यालयास संपर्क साधून वारंवार विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार गत १९ जून २०१७ पासून सर्व कर्मचारी वर्ग एकही शासकीय सुट्टी, किरकोळ रजा न घेता सतत ३६ दिवसांपासून काम करीत आहेत. मानधनाअभावी आमची स्थिती फार हलाखीची आहे. ही समस्या सोडविण्याकरिता या कामगारांकडून तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंतच्या अधिकाºयांना साकडे घालण्यात आले. प्रत्येक अधिकाºयानेच त्यांना समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. दिलेले आश्वासन अधिकाºयांनी पूर्ण केले नाही तर समस्या सोडविण्याकरिता आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.शासनाकडून प्राप्त विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा वेळेस दबाव तंत्राचा वापर केल्यास मानसिकता वाईट होऊन कामावर प्रभाव होण्याची शक्यता आहे. करीता अत्यल्प मानधनात कंत्राटी कर्मचारी काम करीत असल्याची जाणीव ठेवून वागणूक देण्यात यावी. जिल्हा स्तरावरून सतत सर्व कामाचे १०० उद्दिष्ट साध्य करण्याबाबत दबाव वाढत आहे. करीता उपरोक्त बाबीवर आपण गांभिर्य पुर्वक विचार करावा अशी मागणी होत आहे. यावेळी जिल्ह्यातील ग्रामरोजगार आणि कंत्राटी कर्मचारी सहभागी होते.अधिकाºयांनी दिले समस्या सोडविण्याचे आश्वासनसंघटनेच्या पदाधिकाºयांनी विविध समस्या मार्गी काढण्याकरिता अधिकाºयांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान अधिकाºयांनी असलेल्या समस्या मार्गी लावण्यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाºयांना आश्वासन दिले.
मग्रारोहयोच्या कंत्राटी कर्मचाºयांसह ग्रामरोजगार सेवकांचे मानधन अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 2:30 AM
मग्रारोहयो अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर गत सहा ते सात वर्षांपासून कंत्राटी नियुक्तीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना व ग्रामरोजगार सेवकांना तीन महिन्यांपासून कुठलेही मानधन मिळाले नाही.
ठळक मुद्देतीन महिन्यांपासून वेतनाकरिता परवड