केडीके कॉलेजमध्ये विज्ञान मॉडेल व पोस्टर स्पर्धा : अविष्कार-२०१५ ला उत्स्फूर्त प्रतिसादनागपूर : लोकमत कॅम्पस क्लब, लोकमत युवा नेक्स्ट आणि केडीके कॉलेजतर्फे आयोजित विज्ञान मॉडेल व पोस्टर स्पर्धा ‘अविष्कार-२०१५’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात शहर आणि जिल्ह्यातील २००पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी आपली कल्पना आणि विज्ञान सिद्धांताच्या मदतीने एकापेक्षा एक मॉडेल तयार करून उपस्थितांना भुरळ घातली. हा कार्यक्रम देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना समर्पित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि शोधकार्याची आवड निर्माण होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर मॉडेल व पोस्टर प्रदर्शनानंतर सायंकाळी पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. सिद्धार्थ काणे होते. अध्यक्षस्थानी केडीके कॉलेजचे अध्यक्ष आमदार राजेंद्र मुळक उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून कॉलेजचे कोषाध्यक्ष यशराज मुळक, प्राचार्य डॉ. डी.पी. सिंह आणि उपप्राचार्य डॉ. ए.एम. बदर होते. स्पर्धेचे परीक्षण डॉ. एस.वी. मोहरील, डॉ. डी.आर. पांडे, डॉ. इखे, डॉ. पर्वते आणि डॉ. आर.आर. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संगीता वानखेडे, गोविंद रणदिवे, ए.एल. सुलनकर होते. संचालन स्मिता क्षीरसागर यांनी केले. विज्ञान मॉडेल आणि विज्ञानावर आधारित ही पोस्टर स्पर्धा दोन भागात घेण्यात आली. ही स्पर्धा आतंरशालेय (वर्ग ८ ते १०) आणि आंतरमहाविद्यालयीन (वर्ग ११ ते १२) या दोन भागांत विभागण्यात आली होती. या दोन्ही दोन्ही गटातील प्रथम विजेत्याला पाच हजार, द्वितीय तीन हजार आणि तृतीय विजेत्याला दोन हजार रुपयांचा पुरस्कार तर प्रोत्साहन पुरस्कार प्रत्येक गटातील पाच-पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी हजार रुपये उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.मॉडेल स्पर्धा : (वर्ग ८ ते १०) प्रथम- नेताजी मार्केट हिंदी हायस्कूल सीताबर्डी, द्वितीय- व्हीटी कॉन्व्हेंट बेलतरोडी, तृतीय- शिशु ज्ञान मंदिर नंदनवन. प्रोत्साहन पुरस्कार - बी.के.सी.पी. स्कूल कन्हान, राजेन्द्र हायस्कूल महाल, दुुर्गा नगर माध्यमिक शाळा मानेवाडा, बी.आर. मुंडले हायस्कूल उत्तर अंबाझरी रोड, व्ही.टी. कॉन्व्हेंट अत्रे ले-आउट.पोस्टर स्पर्धा : प्रथम- बी.आर. मुंडले, दक्षिण अंबाझरी रोड, द्वितीय- श्रेयश कॉन्व्हेंट वर्धमान नगर, तृतीय- गायत्री कॉन्व्हेंट नंदनवन. प्रोत्साहन पुरस्कार- भगवती गर्ल्स हायस्कूल नंदनवन, संस्कार विद्यासागर नंदनवन, राजेंद्र हायस्कूल महाल, व्ही.टी कॉन्व्हेंट, अत्रे ले-आउट, बाबा नानक हायस्कूल गरोबा मैदान.मॉडेल स्पर्धा : (वर्ग ११ ते १२) प्रथम- न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, द्वितीय- व्ही.टी.सी. ज्युनिअर कॉलेज, तृतीय- विनायकराव देशमुख ज्युनिअर कॉलेज. प्रोत्साहन पुुरस्कार- न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज काँग्रेस नगर, जीवन विकास विद्यालय उमरेड, संताजी ज्युनिअर कॉलेज वर्धा रोड, शाहूज गार्डन ज्युनिअर कॉलेज, न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज महाल.पोस्टर स्पर्धा : (वर्ग ११ ते १२) प्रथम- भवन्स भगवानदास पुरोहित ज्युनिअर कॉलेज वाठोडा, द्वितीय- हडस ज्युनिअर कॉलेज, तृतीय न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज महाल. प्रोत्साहन पुरस्कार- दीनानाथ ज्युनिअर कॉलेज, न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज महल, मोहता सायन्स कॉलेज, जे.एन.टाटा पारसी गर्ल्स ज्युनिअर कॉलेज ला दोन पुरस्कार प्राप्त झाले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या विज्ञान मॉडेलने घातली भुरळ
By admin | Published: October 19, 2015 2:49 AM